जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वाघनगर जिजाऊ नगरातील पस्तीस वर्षीय महिलेसह तिच्या घरातील सदस्यांवर रविवारी सकाळी साडे सात शिवीगाळ करुन काठीने हल्ला केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशिकला पुंजू बाविस्कर (वय-३५) यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, राजु किसन बाविस्कर, सगिता बाविस्कर, आशीष, लक्ष्मी राजु बाविस्कर अशांनी मागील भांडण उकरुन काढत रविवार (ता.१४) रेजी सकाळी साडे सात वाजता शिवीगाळ करुन काठीने मारहाण करण्यात आली. जखमीच्या जबाबावरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक अनिल मोरे करत आहेत.