जळगाव (प्रतिनिधी) शहरातील द्रौपदीनगर, प्रेमनगर नियर रायसोनी फन स्कुल जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात बँक मॅनेजर अमित हरिषचंद्र मुणगेकर (वय ४२, रा. राकेश नगर, पार्वती काळे नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १७ मार्च २०२२ रोजी सकाळी ५:३० वाजेच्या पूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM प्लॉट नंबर १९ गट १४/३ द्रोपदीनगर, प्रेम नगर नियर रायसोनी फन स्कुलजवळील ATM काही अज्ञात इसमांनी कॅमेरावर स्प्रे मारुन, लॉक तोडुन ATM चे नुकसान केले व रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहेत.