भुसावळ (प्रतिनिधी) जुन्या वादावरुन तरुणास जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नातील संशयित आरोपीस भुसावळ बाजारपेठ पो. स्टे गुन्हा शोध पथकाने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवेन्द्र उर्फ बापू विनोद जावरे (वय-३१) असे संशयित आरोपीचे नाव असून याला आज (दि.०८) रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील गडकरी नगर भागातून सापडा रचुन ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळलेल्या गुप्त माहितीवरुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
भुसावळ बाजारपेठ पो. स्टे. भाग ५ गुरण.९१६/२०२० भादवि कलम-३०७,५०६,३४ प्रमाणे दि. २७ ऑक्टोबर रोजी १०: ३१ गुन्हा दाखल असून यातील फिर्यादी नामे-अजय गिरधारी गोडाले (वय-२८) रा.भुसावळ यास (दि. २७) रोजी २१:३० वाजेच्या सुमारास यातील आरोपी यांनी मागील भांडणाच्या कारणावरून आरोपीच्या नवीन बांधकाम असलेल्या घराच्या गच्चीवरून खाली फेकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, जळगाव तसेच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे भुसावळ भाग व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरी.अनिल मोरे, मंगेश गोटला, सहा.फौज.तस्लिम पठाण, पो.ना.रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, समाधान पाटील, उमाकांत पाटील, तुषार पाटील, पो.का. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे, योगेश महाजन, दिनेश कापडणे, सुभाष साबळे, सचिन चौधरी व होम गार्ड सुरळकर अशांनी अटक केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.निरी. अनिल मोरे व पो.ना.समाधान पाटील करीत आहेत.