जळगाव (प्रतिनिधी) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब निराधार स्वावलंबन योजने अंतर्गत कर्जबाजारीपणा व कर्जफेडीचा तगादा या कारणांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्येप्रकरणी मयत शेतकऱ्यांच्या परिवारांसाठी चरितार्थाचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अशा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीसाठी विशेष बाब म्हणून विधवा पत्नीच्या नावे ऑटो परवाना वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना” शासन निर्ण क्र. एमव्हीआर ०११६/प्र.क्र. १५/परि-२, दिनांक २१/०१/२०१६ अन्वये मान्यता दिली आहे. या योजनेची प्रभावी पणे अंमलबजावणी व्हावी या करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव या ठिकाणी पाठपुरावा करणार असून ज्या महिलांना परवाना हवा असेल त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी केले आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला एक ऑटोरिक्षा परवाना देण्याबाबत अटी व शर्ती खालीलप्रमाणे :
मा. जिल्हाधिकारी, जळगांव यांचे कार्यालयाकडून या संदर्भात प्राप्त झालेल्या यादीत लाभार्थीचे प्रकरण मंजूर असणे आवश्यक राहील.ऑटोरिक्षा परवाना जारी करताना ऑटोरिक्षाचे लायसन्स व बॅज असण्याची आवश्यकता नाही. अर्जदार वास्तव्यास असलेल्या ठिकाणावरून कॅन्टोन्मेंट, सह महानगरपालिका क्षेत्र किंवा महानगरपालिका क्षेत्र वगळून जळगांव जिल्हा असे ऑटोरिक्षा परवाना वापरावयाचे कार्यक्षेत्र राहील.
प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील जळगांव महानगरपालिका क्षेत्रामध्ये वास्तव्यास परवाना धारकांना ३+१ आसनी पेट्रोल / एल.पी.जी. इंधनावर चालणारी नवीन नोंदणी केलेली ऑटोरिक्षा परवान्यावर दाखल करणे बंधनकारक राहील.परवान्यावरील ऑटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे अनिवार्य राहील.सदर परवाना कायमस्वरुपी देण्यात येत असून या परवान्याचे दुसऱ्याच्या नावे हस्तांतरण करता येणार नाही अथवा ज्या वेळी लाभार्थीस परवान्याची आवश्यकता भासणार नाही त्यावेळी सदर परवाना लाभार्थीने प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावा लागेल. मोटार अधिनियम १९८८ व त्या अंतर्गत तयार केलेल्या नियमातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक राहील. आटो रिक्षा परवानाच्या माध्यमातून रोजगार विधवा भगिनी यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो किंवा स्वतःची रिक्षा सुद्धा त्यांना घेता येईल. या योजनेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी असे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.