कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) मानवसेवा विद्यालय जळगाव शाळेचे सृजनशील चित्रकार सुनील दाभाडे यांनी जळगावच्या सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने बहिणाबाईंची गाजलेली संसार कविता “अरे संसार संसार, जसा तावा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके, तव्हा मियते भाकर” व्यवहार व मानसशास्र यांचा मनोज्ञ संगमातून संसाराच्या सुख दुःखातील लेवा गाणबोलीतील हे अजरामर शब्दचित्र. या कवितेतील जीवन विषयक आशय मूल्यांना चक्क तव्यावर बहिणाबाईंच्या प्रतिमेससह आकर्षक रंगात चित्रित केले आहे.
बहिणाबाईंची कविता प्रकाशित झाल्यानंतर आजतागायत अनेक कलावंतांनी त्यांच्या कवितांवर इल्युस्ट्रेशन कागदावर, कॅनव्हासवर केले असेल परंतु चक्क तव्यावर ही कविता अभिनव पद्धतीने चित्रित करून दाभाडे यांनी कवितेचा हा कलात्मक सत्कार केला. त्यामुळे बहिणाबाई चौधरी परमानंदाने स्वर्गात आत्मतृप्त होतील ! यापूर्वी चित्रकार सुनिल न्हानू दाभाडे यांनी अतिशय कल्पकतेने प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ज्वारीच्या भाकरीवर काढले ही पोस्ट अल्पावधीत प्रचंड वायुवेगाने व्हायरल झाली. याची दखल ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने “जगातली पहिली ज्वारीच्या भाकरीवरील बाबासाहेबांची पेंटिंग” म्हणून नोंद घेऊन दाभाडेंचा गौरव केला.
अवलिया चित्रकार दाभाडे यांच्या अतर्क्य, अतुलनीय कलाप्रवासात मानवसेवा मंडळ संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष डॉ . आर . एस . डाकलीया सर्व पदाधिकारी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया आंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, शिक्षक वृंद यांच्यासह पिताश्री न्हानू दाभाडे, सेवानिवृत्त प्राचार्य डायट जळगाव, भारतरत्न डॉ. ए.पी.जे .अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, अथर्व प्रकाशनाचे प्रकाशक युवराज माळी, गायक मानव भालेराव, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, विजय चव्हाण, सुकदेव मावळे, अनिल चव्हाण,प्रेमकुमार सपकाळे, सचिन मुसळे, मनोज जंजाळकर, संदिप पवार, मनोज बारस्कर, गिरीश जाधव, दिनेश बाविस्कर, विकास चौधरी, आप्पासाहेब साळुंखे ,रा.ना.सोनवणे, उखर्डू साळूंखे, पंडितराव सोनवणे, बाबूलाल खांदे या मान्यवरांची प्रेरणा, प्रोत्साहन व मागदर्शन नेहमी मिळत असते असे सुनिल दाभाडे यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
चित्रकार सुनिल दाभाडे यांना प्राप्त पुरस्कार आणि मानसन्मान
खान्देश कलारत्न पुरस्कार
इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे सेवा कलाविष्कार पुरस्कार
मानव सेवामंडळातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार
माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव तर्फे बेटी बचाव बेटी पढाव पेटी च्या माध्यमातून जनजागृती केल्याबद्दल शिक्षक गौरव पुरस्कार
मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशन जळगाव तर्फे ” विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा दत्त पुरस्कार ”
सूचना आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या तर्फे ” बेटी बचाव बेटी पढाव सन्मानपत्र ”
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य विषय पर्यावरण मॉडेल प्रथम क्रमांक
शिक्षण विभाग जळगाव पंचायत समितीतर्फे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक
लोकमत युवा मंच आयोजित राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत द्वितीय क्रमांक
मान्यवरांचे पोट्रेट अन् कलाशिर्वाद (राष्ट्रपती भवन दिल्ली)
अनाथांची आई सिंधुताई सपकाळ
सरकारी वकील उज्वल निकम साहेब
कीर्तनकार बाबा सातारकर महाराज
सहकारमंत्री गुलाबराव देवकर पाटील
पद्मश्री भवरलालजी जैन
आमदार उल्हास पाटील
आमदार सुरेशदादा जैन
जिल्हा पोलीस अधीक्षक सुपेकर साहेब
माजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे
अभिनेता नाना पाटेकर
संजय नार्वेकर
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पी. पी. पाटील
अविनाश धर्माधिकारी, पुणे
संगमनेरचे सुप्रसिद्ध प्रभावशाली वक्ते डॉ. संजय मालपाणी
अभिनेता विक्रम गोखले
जगातलं पहिलं चित्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्वारीच्या भाकरीवर काढलेल्या अभिनव पेटींगची नोंद ओएमजी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात येणार आहे.