चोपडा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी तालुका अध्यक्ष ,चोपडा उर्वेश लक्ष्मण साळुंखे यांनी कोरोना विषाणूपासुन कसे सावधान राहता येईल, याबाबत एक सुंदर असा उपक्रम राबवत असून कोरोना विषाणूपासुन कसे सावधान राहण्यासाठी नियम पत्रिका व छायाचित्रे छापून बुधगाव, अनवर्दे, वाळकी, मालखेडा, शेंदणी अशा आजुबाजु परिसरात जावुन दुकाने, मंदिर, मेडिकल, बॅंक शाखा, चौकात इ. ठिकाणी जावुन पत्रिका चिटकवले व जनजागृती करण्यात येत आहे.
या उपक्रमात सहभागी असणारे उर्वेश साळुंखे, रामकृष्ण धनगर, हर्षल साळुंखे, विशाल साळुंखे, गोरख साळुंखे , रमेश पाटील, गणेश शिंदे, भुरा कोळी, संजय साळुंखे आदी नी सहकार्य केले.
नियम पाळा कोरोना टाळा
अत्यंत आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडा. घरा बाहेर जात असताना मास्क, सॅनीटायझजर चा वापर करा.
*वापरलेले मास्क याची योग्य विल्हेवाट लावा.
*स्वत: आणि इतरांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवा.
*कोणत्याही वस्तू ला हात लावल्यास स्वछ धुवून काढा.
*सर्दी, पडसे ,खोकला ताप, वाटल्यास त्वरित तपासणी करा.
*पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.
*दिवसातुन किमान दोन वेळा गरम पाण्याची वाफ घ्या.
*भाजीपाला , फळे इ. वस्तू धुवून घ्या.
*दैनंदिन स्वरूपात उपाशी राहू नका.व सकस आहार घ्यावा.
* वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवून काढा.
* डोळे, नाक आणि तोंडावर स्पर्श करणे टाळा.
*खोकताना व शिकतांना रुमालाचा वापर करा.
*कोविड १९ विषय नवीन घडामोडी जाणून घ्या.
*स्व:ताचे संरक्षण कसे करावे याबाबत माहितीसाठी आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क करा.
*आपली व आपल्या परिवारातील सदस्य यांची काळजी
वरील दिलेली माहिती वाटप करण्यात आलेल्या पत्रिकेत देण्यात आली आहे.