TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयुष्यमान भव: योजनेत जळगाव राज्यात अग्रेसर ठरेल ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास !

आयुष्मान कार्डाचे घरोघरी वाटप करा ; 'आयुष्यमान भव' मोहिमेचा पालकमंत्र्यांचे हस्ते शुभारंभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीत कायम अग्रेसर राहिला आहे. ‘आयुष्यमान भव:’ या योजनेत ही जिल्ह्याचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणारे ‘आयुष्यमान कार्ड’ चे घरोघरी वितरण करण्याचे काम प्रशासनाने करावे. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

‘आयुष्मान भव:’ अभियानांचा जळगाव जिल्ह्याचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, नागरिक यांच्यांशी फेसबुक लाईव्हद्वारे थेट संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी यावेळी उपस्थित होते.

READ ALSO

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यात चांगले काम होत आहे. उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनेची ओळखपत्रे काढून द्या. वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असेही त्यांनी सांगितले.

‘आयुष्यमान भव: ‘एक देशव्यापी अभियान आहे. प्रत्येक गाव आणि शहरात आरोग्य सेवा प्रदान करणे. हा या अभियानाचा उद्देश असून या माध्यमातून स्वच्छता अभियान, आयुष्यमान सभा, अवयव दान मोहीम, रक्तदान शिबिर, अंगणवाडी मधील मुलांची तपासणी यासारखे उपक्रम राबवून जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारचे आरोग्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जिल्ह्यातील प्रत्येकाने सहभागी होऊन ‘आयुष्यमान भव:’ ही मोहीम लोक चळवळ म्हणून उभी करावी. शंभर टक्के ही मोहीम यशस्वी करावी. असा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.‌

राज्यात आजपासून १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबवली जाणार आहे. असे नमूद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, आयुष्यमान कार्डसाठी आपल्या जिल्ह्याचे उद्दिष्ट १४ लक्ष ६८ हजार ६२५ आहे. त्यापैकी चार लक्ष ९१ हजार ६७४ कार्ड वितरित करण्यात आलेले आहेत. उर्वरित कार्डधारकांना या मोहिमे दरम्यान आयुष्यमान कार्ड काढून देण्यासाठी सर्व आशा स्वयंसेविका कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान मोहीम, अवयवदान मोहीम, आयुष्यमान सभा, “आयुष्यमान आपल्या दारी ” अंगणवाडी, प्राथमिक शाळांमध्ये मुलांची तपासणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सदर अभियान यशस्वीपणे राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित म्हणाले. ‘आयुष्मान भव:’ ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेमध्ये आयुष्मान आपल्या दारी , आयुष्मान मेळावा, आयुष्यमान सभा, अंगणवाडी व शाळेतील मुलांची तपासणी या योजनाच समावेश आहे. आयुष्मान मेळाव्यात रक्तदान व शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केले जाणार आहेत. आयुष्मान सभा अंतर्गत २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने गाव पातळीवर आयुष्मान सभांचे आयोजन केल्या जाणार असून सर्व आजाराची माहिती देणे तसेच आयुष्मान बाबत जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
Next Post

पूरामुळे बाधीत शेती क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करा : ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नागपुरच्या उमरेड मार्गावर भीषण अपघात ; कार ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

May 7, 2022

जावयाने मारला सासूच्या घरात डल्ला ; सोन्याचे दागिने लांबवले !

October 1, 2023

मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे : शिवसेना

July 19, 2021

महानायक अमिताभ बच्चनविरोधात भाजप आमदाराची पोलिसात तक्रार

November 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group