चोपडा (प्रतिनिधी) राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाची कार्यकारणी घोषित करण्यात असून उपजिल्हाध्यक्षपदी अमृतराज सचदेव,तालुकाध्यक्षपदी विजय उर्फ बाळासाहेब पाटील तर शहराध्यक्ष म्हणून गिरीश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा बँक संचालक घनश्यामभाई अग्रवाल, माजी झेड.पी.सदस्य सुनील पाटील, बाजार समितीचे माजी चेअरमन नारायणदादा पाटीलव जेष्ठनेते प्रवीणभाई गुजराथी यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आलेत.
लवकरच तालुक्यातील खेड्यापाड्यात ही पक्ष बांधणी करू पक्ष संघटना वाढवू, असे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले .येणाऱ्या सर्वच स्थानिक स्वराज्याच्या व विधानसभा, लोकसभा यांच्या निवडणुका पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार आम्ही कामाला लागू असेही ते म्हणाले. चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अरविंद मानकरी,जिल्हाध्यक्ष,निलेश पाटील,माजी संचालक चो,सा,खा,रमाकांत बोरसे,माजी सरपंच वेळोदे, मिलिंद देवराम सोनवणे शहर अध्यक्ष सा,न्या,विभाग,विनोद पाटील सुत गिरणी संचालक,शुभम सोनवणे युवा शहर अध्यक्ष,सचिन धनगर,भरत पाटील,संजय बिर्हाडे, भूषण पाटील,किरण मोरे, सचिन पाटील,रवींद्र पाटील,कादर तडवी,आत्माराम पाटील पत्रकार,प्रसाद पाटील,वलय पाटील,ऍड,दिनेश वाघ यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.