धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने बलिप्रतिपदा निमित्त बळीराजा पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील होते. मार्केट कमिटीचे माजी सभापती जिजाबराव पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास माळी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन भाजप तालुका अध्यक्ष दिनेश भाऊ पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुकाध्यक्ष डी. ओ. पाटील, पी. एम. पाटील सर, शिरीष आप्पा बयस, ॲड. संजय भाऊ महाजन, विनय भावे, विलास महाजन, विजय महाजन, वाल्मीक पाटील, दिलीप महाजन, पुनिलाल महाजन, सुनील चौधरी, प्रवीण महाजन, अन्नू बाजपेयी आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांना रुमाल, टोपी व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदन दादा पाटील, भैया मराठे, भीमराज पाटील, निलेश महाजन, गजानन साठे, गणेश मराठे, विकी महाजन, कल्पेश महाजन, परेश जाधव, ललित येवले, गोपाल पाटील आदींनी परिश्रम घेतले.















