TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालरंग नाट्यशिबिराचा सांस्कृतिक सादरीकरणाने समारोप !

भैय्यासाहेब गंधे सभागृहातील हाऊसफुल्ल रसिकांसमोर ३५ बालकलावंतांनी केले सादरीकरण !

vijay waghmare by vijay waghmare
May 27, 2024
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बालकलावंतांवर नाट्यसंस्कार होवून, नृत्य, नाट्य व संगीताच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून यंदा उन्हाळी सुट्टीमध्ये बालरंगभूमी परिषद व नाट्यरंग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालरंग नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज बालरंग महोत्सवाच्या माध्यमातून या शिबिराचा समारोप करण्यात आला.

या शिबिरात विद्यार्थ्यांना नृत्य, नाट्य व संगीत तसेच रंगमंचावरील अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आदी नाट्यांगांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या सर्व कलांचा समन्वयातून २ तासांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे आमदार राजूमामा भोळे, जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर.चौधरी, ज्येष्ठ रंगकर्मी हेमंत कुलकर्णी, चिंतामण पाटील, नाट्यसमीक्षक राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. सुरुवातीस मान्यवरांसह बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे व नाट्यरंगच्या अध्यक्षा सौ.दिशा ठाकूर यांच्या हस्ते नटराजपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक बालरंगभूमीचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

उपस्थितांना संबोधित करताना प्रमुख पाहुणे भालचंद्र पाटील यांनी आजच्या युगात मुलांना मोबाईलकडून कलेकडे वळविण्यासाठी नियमितपणे अशा शिबिरांचे आयोजन बालरंगभूमी परिषदेने करावे. पालकांना मुलांकडून जे अपेक्षित आहे त्याची सुरुवात पालकांना स्वतःपासून करावी ही अपेक्षा व्यक्त केली. आमदार राजूमामा भोळे यांनी नाट्यकलेच्या माध्यमातून मुलांच्या बुध्दांकासोबतच विविध कलांच्या माध्यमातून त्यांना इमोशन कोशंटही वाढण्यास मदत होते. बालपण ही ओली माती असते, तिला लहानपणापासूनच वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून आकार मिळाल्यास उद्याचा सुजाण व जबाबदार नागरिक तयार होवू शकतो. या सर्व प्रयत्नांसाठी लागेल ती मदत करण्याची तयारी त्यांनी यावेळेस दर्शविली. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या बाल राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिक प्राप्त करणाऱ्या बालकलावंतांना सन्मानपत्र देवून सन्मानीत करण्यात आले व शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिंनींना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

बालरंग महोत्सवातंर्गत शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींनी संस्कृत गीतगायन, गणेश वंदना ‘पहिलं नमन’ यावर नृत्य सादर केले. त्यानंतर अमोल ठाकूल लिखीत दिग्दर्शित मैत्रीची गुफा आणि म्हावरा गावलाय गो या दोन बालनाट्यांचे प्रयोग सादर करण्यात आले. या बालनाट्यातून माार्वी पाटील, मनस्वी पाटील, समाइरा बाविस्कर, संस्कृती वाणी, देव जोशी, चैतन्य रोटे, भार्गवी महाजन, आरुषी महाजन, वीणा निकम, दुर्गेश हिवाळे, अमोघ पवार, रुद्र पाटील, राजवीर पाटील, मयंक ठाकूर, केतकी कोरे, प्रभुदत्त दुसाने, प्रेम काळे, नीलय इंदुरकर, योगेश्वरी कोळी, काव्या खडके, निर्गुणी बारी, अवनी सोनवणे, जान्हवी सोनार, समर्थ हिरवणे, रागिणी सोनवणे, प्रणव जाधव, अथर्व पाटील, श्लोक गवळी, राशी पडलवार, दर्श पाटील, शर्वा जोशी, स्वरा महाजन, वेदा बारी, अथर्व रंधे, कृतिका कोरे या बालकलावंतांनी अभिनय केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कोरे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व नाट्यरंग थिएटर्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBalrang naty shibir

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

नुकसानग्रस्त मेंढपाळ बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी : रोहिणीताई खडसे यांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विहिरीतून पाणी काढताना महिलेचा पाय घसरून मृत्यू !

April 26, 2024

‘…तर आरएसएससाठी भारत हा फक्त नकाशा’ : राहुल गांधी

May 25, 2022

मुक्ताईनगरात जबरी चोरी ; दाम्पत्याला अडवून रोकडसह सोन्याची पोत लांबविली !

April 2, 2022

‘भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत’ : रक्षा खडसे

November 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group