मुंबई (वृत्तसंस्था) शहरात सार्वजनिक जलाशयांमध्ये छठ पूजेवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईमधील बीच, तलाव आणि किनाऱ्यांवर छठ पूजा करता येणार नसल्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. बीएमसीने यासंबंधीत आदेशही जारी केले आहे.
कोरोनामुळे हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. छठ पर्व 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत साजरा केला जातो. यापूर्वीच मुंबईमध्ये सार्वजनिक जलाशयांच्या आजुबाजूला छठ पूजा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ मुंबईच नाही तर झारखंडनेही हा निर्णय घेतला होता. झारखंड सरकारने सार्वजनिक जलाशयांच्या आजुबाजूला छठ पूजा करण्यास बंदी घातली होती. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. झारखंड सरकारच्या या निर्णयाचा भाजपने विरोध केला. यानंतर सीएम सेमंत सोरेन स्वतः समोर आले आणि म्हणाले की, बंदी हटवण्यात येत आहे, मात्र जलाशयांमध्ये पूजा करताना सर्वांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. मास्क लावावे लागेल.