पाळधी (प्रतिनिधी) येथील देवकर कॉलनीतील रहिवासी यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडे देवकर कॉलनी येथील ओपन प्लेसच्या सुशोभीकरणाची मागणी केली होती. प्रतापराव पाटील यांनी तात्काळ फाउंडेशनचे अध्यक्षांना कळविले. त्यानंतर जेसीबी व रोड रोलरच्या सहाय्याने ओपन प्लेसचे सुशोभीकरण करण्यात आले.
कॉलनीतील लहान मुले व वृद्ध लोकांसाठी उपयोगी पडणारा या ओपन प्लेस येथे भरपूर घाण साचली होती. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश नारायण सोनवणे, प्रतीक पाटील, पियुष पाटील, सरपंच अरुण एकनाथ पाटील यांना कळविले त्यांनी तात्काळ जेसीबी व रोड रोलरच्या सहाय्याने तो ओपन प्लेस चकचकीत केला. यावेळी पाहणी करतांना जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना शहर प्रमुख आबा माळी, बळीराम कोळी, सुभाष नंनवरे, अनिल माळी, गोकुळ नंनवरे, समाधान माळी उपस्थित होते.