जळगाव (प्रतिनिधी) भादली खु. येथील उपसरपंच कमलाकरभाऊ बोरसे यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीररित्या शिवसेनेत प्रवेश केला.
कमलाकरभाऊ बोरसे यांनी आगामी काळात ना. गुलाबराव पाटील आणि जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा मानस बोलून दाखविला. यावेळी भादली खु. येथील शिवसेनेचे युवा नेतेआणि प्रगतीशील शेतकरी अमोल भरतराव बोरसे, भोकर येथील बालाशेठ, मा. सरपंच अरुण सोनवणे, ग्रा. पं. सदस्य रवींद्र सोनवणे, करंज येथील ज्ञानेश्वर पाटील, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.