कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील भारती माध्यमिक विद्यालय कासोदा या शाळेचा यावर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल हा शंभर टक्के लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेतून एकूण ४७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यात ३८ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले तर नऊ विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास झाले आहेत.
भारती विद्यालयातून गौरव राजेंद्र फणसे हा ९३ टक्के गुण मिळवून पहिला आला तर वैभवी रंगनाथ सोनार ९२.८० टक्के गुण मिळून दुसरी आली ९१.४० टक्के गुण मिळवून वैष्णवी गोरख चौधरी ही तिसरी आली. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोरोना काळात अचूकपणे ऑनलाइन शिक्षण दिल्यामुळे शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शरद शिंदे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना चौधरी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कुलदीप पवार राजेंद्र ठाकरे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.