TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भवरलाल एँड कांताई जैन फाऊंडेशन ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सव’ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सांस्कृतिक मंत्रालय आणि रक्षा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सव’ ही अखिल भारतीय नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. देशभरातील सर्वोत्तम नृत्य प्रतिभा निवडणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. निवड झालेल्या कलावंताना २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त संपन्न होणाऱ्या परेडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान स्वप्रतिभेचा आविष्कार सादर करण्याची संधी मिळावी हासुद्धा हेतू या आयोजनामागे आहे. भारतीय युवापिढीने आपला समृद्ध वारसा जपताना संस्कृतीशी त्यांचं नातं घट्ट जोडणे हे महत्त्वपूर्ण राष्ट्रीय एकात्मता अनुबंधित करणारं ध्येय या आयोजकांचे आहे.

प्रस्तुत स्पर्धेत क्लासिकल, फोक (लोकनृत्य), ट्रायबल आणि फ्यूजन/कंटेम्पररी या चार नृत्य प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. ही स्पर्धा जिल्हा, राज्य, झोनल आणि राष्ट्रीय स्तर अशा चार टप्प्यात विभागण्यात आली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी जळगाव जिल्हातील १५ नृत्य सादर करण्यात आली. त्यातून १२ नृत्यांची निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धेत देशातील २८ राज्य सहभागी होते. महाराष्ट्राचे ३४ नृत्य सादर करण्यात आले त्यातूनही १२ नृत्यांची निवड झाली. त्यानंतर झोनलस्तरीय स्पर्धेत ७ राज्यचे एकूण ३८ नृत्याचे सादरीकरण झाले. त्यातून फक्त १५ नृत्यांची निवड करण्यात आली. अभिमानास्पद बाब म्हणजे, भवरलाल एँड कांताई जैन फाउंडेशनने सर्व स्पर्धांमध्ये यश प्राप्त केले. आणि १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत नृत्य सादर करणार आहेत.

READ ALSO

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

राष्ट्रीयस्तरावरील ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सवा’त भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलित अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे माजी विद्यार्थी सहभागी झाल्याचा आनंद अधोरेखित करण्यासारखा. महान उद्योजक श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंनी सामाजिक बांधिलकीच्या अंत:प्रेरणेने विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक. यातील शैक्षणिक उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग या दृष्टीने अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलकडे पाहिले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजघटकातून विद्यार्थ्यांची रितसर निकषांनुसार निवड करून अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये प्रवेश दिला जातो. प्रज्ञा-प्रतिभेच्या विकसनासोबत विद्यार्थ्यांच्या अंतरंगातील सुप्त कलागुणांना शालेय स्तरावरील विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जाते. पाठ्यपुस्तकातील नियमित अभ्यासक्रमातही अनुभूतीचे विद्यार्थी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण होतात, शिवाय शालेय छंद वर्गातून कलानिपुणतेचा सर्वांग सुंदर आविष्कारही करतात.

राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी भवरलाल एँड कांताई फाऊंडेशनतर्फे नृत्य सादर करणारे कलावंत

वेदांत बांगडे, हेमंत माळी, विरेंद्र ताडे, उमेश झुरके, ललित हिरे, पवन खोडे, सनी शेटे, सचिन राजपूत, रोशन पवार, निकेश जाधव, रोहन चव्हाण, सुमीत भोये, मंगेश चौधरी, निर्मल राजपूत, रितीक पाटील हे आहेत. ज्ञानेश्वर सोनवणे (नाना सर) यांनी नृत्य शिक्षक आणि रुपाली वाघ यांनी संघ प्रमुख या नात्याने जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी भवरलाल अँड कांताई फाऊंडेशनतर्फे नृत्य सादर करणाऱ्या कलावंतांना फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
क्रीडा

११ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा गौरव बोरसे, चाळीसगावचा देवांक लढ्ढा तर मुलींमध्ये ज्ञानवी भारंबे व भाग्यश्री सूर्यवंशी यांची निवड

June 7, 2025
कृषी

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

June 7, 2025
Next Post

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळ ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळमधून अट्टल चोरट्यांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद !

November 24, 2022

भाऊ गेला, विधवा वहिनीशी लग्नाचा निर्णय, तिच्या मुलालाही सांभाळणार ; सर्व स्तरातून तरुणाचं कौतुक !

June 1, 2023

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

March 7, 2021

बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना मी काडीचीही किंमत देत नाही ; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

April 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group