(धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील मराठा समाज प्रबोधिनी संस्थेच्या सभागृहाचे भूमिपूजन ४ ऑक्टोबर रोजी दु. 2 वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील व खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते होणार आहे.
संस्थेने इंदिरा गांधी कन्या विद्यालयामागे जागा घेवून ठेवली होती. या जागेत सभागृह, वस्तीगृह,अभ्यासिका व सुसज्ज स्पर्धा परिक्षा केंद्र उभारणार आहे. या भूमिपूजन सोहळयाला मराठा समाजातील सर्व बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मराठा प्रबोधनी संस्थेचे अध्यक्ष डॉ डी पी पाटील,उपाध्यक्ष पी एम पाटील सर,उपाध्यक्ष डी जी पाटील साहेब,सचिव डी आर पाटील सर,सहसचिव धनराज पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.