जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी विवेक ठाकरे याच्या शिक्रापूरच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्जावर आज दोन्ही पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला. यावर आता मंगळवारी निकाल येणार आहे. दुसरीकडे डेक्कनच्या गुन्ह्यात सुजित वाणीच्या जामीन अर्जाबाबत सोमवारी तर मंगळवारी विवेक ठाकरे आणि सीए महावीर जैन यांच्या जामीन अर्जावर न्यायालय आदेश देणार आहे. तर मंगळवारपासून धरम सांखलाच्या जामीन अर्जावर युक्तिवादाला सुरुवात होणार आहे.
आज संशयित आरोपी विवेक ठाकरे याच्या अर्जावर युक्तीवादास सुरूवात झाल्यानंतर सरकार पक्षाकडून अॅड. वाडेकर म्हटले की, गुन्ह्याची सर्व कागदपत्र सध्या डेक्कन पोलिसांकडे आहेत. त्यामुळे साक्षीदार तपासणी तसेच ठाकरेने एकूण किती जणांना फसवले?, याबाबत माहिती जाणून घ्यायची आहे. बारामती येथील एका ठेवीदारांना ठाकरेच्या संघटनेला १ हजाराची पावती घेतली. पण ठेव मिळवून न देता पैशांचा अपहार केल्याची तक्रार केली असल्याचे न्यायालयास सांगितले. यावर ठाकरेची वकील अॅड. उमेश रघुवंशी यांनी जोरदार युक्तिवाद केला. अॅड. रघुवंशी म्हटले की,डेक्कन पोलिसांनी याआधी ठाकरेची कस्टडी घेतलेली आहे. घर, ऑफिस येथून कागदपत्र देखील जप्त केले आहेत. याआधी पोलिसांनी जामनेर, जळगाव तसेच नाशिक येथील मालमत्तेचा तपास केला आहे. त्यामुळे आता शिक्रापूरच्या गुन्ह्यात वेगळे काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. गुन्हा पावत्या मॅचिंग करून दिल्याचा आहे. ठाकरे यांनी फसवून केल्याचा नाही. बारामतीच्या ठेवीदाराची फसवणूक झाली होती. तर त्यांनी बारामती स्वतंत्र गुन्हा का दाखल केला नाही?. ठाकरे यांनी पोलीस तपासात सुरुवाती पासून सहकार्य केले आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी अॅड. रघुवंशी यांनी केली. दरम्यान, यावर आता मंगळवारी निकाल येणार आहे. तर दुसरीकडे डेक्कनच्या गुन्ह्यात सुजित वाणीच्या जामीन अर्जाबाबत सोमवारी तर मंगळवारी विवेक ठाकरे आणि सीए महावीर जैनच्या जामीन अर्जावर न्यायालय आदेश देणार आहे. तर मंगळवारपासून धरम सांखलाच्या जामीन अर्जावर युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. न्यायालयात आता नेमका कुणाचा जामीन होतो आणि कुणाचा फेटाळला जातो?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
















