जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सीए महावीर जैनचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, जामीन दिल्याचा आदेश ऑनलाईन अपलोड झालेला नसून सरकारी वकिलांशी याबाबत अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
याआधी जैनचा जामीन अर्ज जानेवारी महिन्यात फेटाळण्यात आला होता. तर आज जामीन देण्याची मुख्य कारणे आदेश समोर आल्यानंतरच कळणार आहेत. जामीन अर्ज मंजूर झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा प्राप्त झालेला नाही.
सीए महावीर जैन जामीन अर्ज न्यायालयाने एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचालक्यावर मंजूर केला आहे. दरम्यान, आदेश प्राप्त झाल्यानंतरच जामीन अर्ज मंजूर करण्याची नेमकी कारणे समोर येणार आहेत. सीए जैनच्या या आधीचा जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी अॅड.प्रवीण चव्हाण यांनी जोरदार आक्षेप घेत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते की, सीए जैन यांचा बीएचआर घोटाळ्यात कशा पद्धतीने महत्वाचा सहभाग होता. सीए जैन यांनी समानन्याय तत्वाचा वापर न करता वेळोवेळी अवसायक कंडारेला मदत केली होती. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला गेला होता. सीए जैन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला होता. तसेच त्याच्या कार्यालातून जळगाव एमआयडीसीच्या काही फाईल्स् मिळाल्या होत्या. त्या फाईल्स नेमक्या कशाशी संबंधित आहेत?. तसेच तत्कालीन इओडब्ल्यूचे अधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी ज्या कंडारेविरुद्ध तक्रार होती. त्याच अवसायक कंडारेला फॉरेंसिक ऑडिटची साडेसहा लाख रुपये फी सीए महावीर जैनला का द्यायला लावली?, असा प्रश्न अॅड. चव्हाण यांनी उपस्थित करत सीए जैनच्या जामीन अर्जावर जोरदार आक्षेप घेतला होता. दुसरीकडे विवेक ठाकरे याचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. या प्रकरणी पुण्यातील विषेश न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात या सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षाकडून अॅड. प्रवीण चव्हाण तर आरोपींकडून अॅड. उमेश रघुवंशी हे कामकाज पाहत आहेत.