जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधी २०१८ पासून दिल्लीसह राज्य सरकारकडे तक्रारी केलेल्या आहेत. तूर्त आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई सुरु आहे. त्यांची कारवाई संपली की, सविस्तर बोलतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलताना दिली आहे.
एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधी २०१८ पासून दिल्लीसह राज्य सरकारकडे तक्रारी केलेल्या आहेत. ठेवीदारांचे हित जोपासणे, हा आमचा प्रमुख हेतू होता. अगदी खासदार रक्षाताई खडसे अॅड कीर्ती पाटील यांनी देखील याबाबत तक्रार केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई सुरु आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. कारवाई संपली की, सविस्तर बोलतो, असे खडसे म्हणाले.