जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी बीएचआर पतसंस्थेमधील गैरव्यवहाराची संबंधित चौकशीची दिशा आता नाशिकच्या दिशेने वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, आम्ही अनेक कागदपत्र जप्त करुन सोबत आणली आहेत. प्रत्येक कागदपत्राची कसून तपासणी केली जात असल्याची सूचक प्रतिक्रिया आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवटके यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे.
या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेच्या भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, आम्ही अनेक कागदपत्र जप्त करुन सोबत आणली आहेत. प्रत्येक कागदपत्राची कसून चौकशी केली तपासणी केली जात आहे. प्रत्येक मुद्दा तसेच प्रत्येक कागदाची आम्ही स्वतंत्र नोट तयार करत आहोत. हळूहळू त्या दृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान बीएच्या घोटाळ्याचे धागेदोरे नाशिक येथील वॉटर ग्रीसचा ठेका, मांजरपाडा आणि समृद्धी योजनेतील वाहन पुरवठ्याचा ठेक्याच्या दिशेने जातोय का?, असे विचारले असता भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, तुम्ही सांगताय ते मुद्दे तपासाच्या दरम्यान समोर आले तर निश्चित त्याची ही तपासणी केली जाईल, असे सांगितले. दरम्यान, त्यामुळे आता बीएचआर घोटाळ्याच्या चौकशीची दिशा नाशिकच्या दिशेने वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच आम्ही प्रत्येक कागदाचा अभ्यास करतोय हळूहळू तपासाला गती येईल. तसेच अवसायक जितेंद्र खंडारे, सुनील झंवर यांचा शोध घेतला जात असल्याचेही भाग्यश्री नवटके यांनी सांगितले.