जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील (बीएचआर) मधील घोटाळ्यात मुख्य संशयित आरोपी जितेंद्र कंधारे हा वारंवार सुनील झंवर यांची भेट घेत होता. एवढेच नव्हे तर कंडारे औरंगाबाद बुलढाणा अहमदनगर पुणे नंदुरबार या ठिकाणी पतसंस्थेच्या कामकाजा निमित्त वारंवार जात असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य संशयित आरोपी जितेंद्र कंडारे यांचे वाहन चालक कमलाकर भिका कोळी (रा.जकात नाक्याजवळ केसी पार्कमागे, जळगाव) याला अटक केल्यानंतर पोलिसांनी पोलिस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयात नऊ कारणे सांगितली होती. यामध्ये प्रामुख्याने कमलाकर कोळी हा मुख्य संशयित आरोपी जितेंद्र कंडारे यांच्यासोबत सतत रहात होता. त्यामुळे त्यास कंडारे यांच्या प्रत्येक हालचाली बाबत माहिती आहे. त्यामुळे त्याच्याकडून कंडारे यांच्यासह इतर आरोपींची झालेल्या भेटी व त्यांनी केलेले गुप्तकट याबाबत माहिती मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. तसेच कमलाकर कोळी हा याबाबत माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देत आहे. कमलाकर कोळीने पोलिसांना प्राथमिक चौकशीत सांगितले की, कंडारे हे वारंवार सुनील झंवर यांना भेटत होते. त्यामुळे झंवर यांच्या घरी सापडलेले शासनाच्या वेगवेगळ्या कॅसेट अधिकाऱ्यांचे बनावटी कोठे बनवले व त्यांचा कोठे वापर केला?, याबाबत कमलाकर कोळीकडे सखोल विचारपूस सुरू आहे. एवढेच नव्हे तर जितेंद्र कंडारे यांच्यासोबत कमलाकर कोळी हा औरंगाबाद, बुलढाणा, अहमदनगर, पुणे, नंदुरबार या ठिकाणी पतसंस्थेच्या कामानिमित्त वारंवार जात असल्याचे त्यांने सांगितले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कमलाकरला सोबत जाऊन प्रत्यक्ष तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. दरम्यान कमलाकर कोळी हा पाहिजे असलेल्या संशयित आरोपीपैकी प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर यांना ओळखत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले.परंतू त्यांचा ठावठिकाणा बाबत तो संयुक्तिक माहिती देत नाहीय.