TheClearNews.Com
Saturday, July 26, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : संशयितांकडून कोट्यावधींच्या पावत्या मॅचिंग ; पोलिसांची न्यायालयात माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या १२ पैकी उर्वरित ८  संशयिताना आज न्यायालयात हजर करण्यात आले. भंगाळे, झाल्टे,तेली, तोतला, लोढासह इतर संशयितांनी कोट्यावधींच्या पावत्या मॅचिंग केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाच्या निदर्शानासून आणून दिले. जाणून घ्या…आज न्यायालयात हजर केलेल्या सर्व ९ संशयितांवर पोलिसांनी नेमके कोण-कोणते गंभीर आरोप ठेवले आहेत?.

१) भागवत गणपत भंगाळे
(रा.प्लॉट नं.८ आरती अपार्टमेंट एम.जे. कॉलेजच्या पाठीमागे लक्ष्मीनगर जिल्हापेठ, जळगाव)

READ ALSO

देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यापुर्वी बांग्लादेशी तरुणीची सुटका

मोहाडी टेकडीवर ५००० झाडांचे वृक्षारोपण आणि २ लाख देशी बियांचे बीजारोपण : २७ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रम

सदर आरोपीने बीएचआर पतसंस्था शाखा नवी पेठ जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००३२०७०००६५ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये १,२८,४०, ३९६/ पैकी १,०५,३९,८९६/- रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ६० मुदतठेव पावत्या ३० ते ४० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने ठेवीदारांना तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असून तुमच्या ठेवींचे पैसे बुडाले, आमच्या व्यतिरिक्त कोणीही आणि पतसंस्थाही पैसे देणार नाही, जेवढे पैसे मिळतील तेवढे घ्या अन्यथा तुमचे पैसे बुडाले, अशी भिती निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून इतर आरोपी नामे जितेंद्र कंडारे, सुजित वाणी व इतर यांच्या मदतीने स्वत:चे कर्जखाते १०० टक्के प्रमाणे निरंक केल्याच्या नोंदी करून घेतल्या.

२) छगन शामराव झाल्टे
(रा.१५४, बजरंगपुरा चांभार गल्ली जवळ, २४ महुखेडा ता.जामनेर जळगाव )

सदर आरोपीने बीएचआर पतसंस्था शाखा जामनेर जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००२२०१०००२० मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये २९६, १३,३८९/-पैकी २९६,१३,३८९/ रूपये व कर्जखाते क्रमांक ०००२२०१०००३३ मधील एकूण बाकी कर्ज रक्कम रूपये ७५,६६,५३३/- पैकी ७५,६६,५३३/- रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या १६७ मुदतठेव पावत्या ३० ते ४० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने ठेवीदारांना तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असून तुम्हाला ३० टक्के रक्कमच मिळेल त्यासाठी तुमच्या ठेवींच्या मुळ पावत्या व आम्ही तयार करून आणलेल्या प्रतिज्ञापत्रावर सह्या कराव्या लागतील तरच ३० टक्के रक्कम मिळेल अन्यथा मिळणार नाही. अशी भीती निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून इतर आरोपी नामे जितेंद्र कंडारे याच्या मदतीने त्याचा एजंट अनिल पगारीया यांचेकडून ठेवीदारास ३० टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.

३) जितेंद्र रमेश पाटील
(रा. आयडीबीआय बँकेचे पाठीमागे संजिवनी हॉस्पिटल समोर पाचोरा रोड जळगाव)

सदर आरोपीने बीएचआर पतसंस्था शाखा जामनेर जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००२२०१०००३४ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये ५०,१९,२३९/-पैकी ५०,१९,२३९/ रुपये व कर्जखाते क्रमांक ०००२२०१०००२३ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रुपये १७,३७,२१३/- पैकी १७.३७,२१३/- रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ९८ मुदतठेव पावत्या ३० ते ४० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने ठेवीदारांना तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असून तुम्हाला जास्तीत जास्त ३० ते ४० टक्के रक्कमच मिळेल त्यासाठी तुमच्या ठेवींच्या मुळ पावत्या व आम्ही तयार करून आणलेल्या प्रतिज्ञापत्रावर सह्या कराव्या लागतील तरच रक्कम मिळेल अन्यथा मिळणार नाही. अशी भिती निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून एजंट, संतोष बाफना याचेकरवी ठेवीदारास ३० ते ४० टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.

४) असिफ मुन्ना तेली
(रा. आशा कॉम्प्लेक्स महंमद अली रोड ता. भुसावळ जि. जळगाव)

सदर आरोपीने बीएचआर पतसंस्था शाखा जामनेर जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०२३७२०७००००१ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये १, १२, १२, १२५/-पैकी १,०१,१२,१२५/ रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ४४ मुदतठेव पावत्या ३० ते ४० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने ठेवीदारांना तुम्हाला जास्तीत जास्त ३० ते ४० टक्के रक्कमच मिळेल त्यासाठी तुमच्या ठेवींच्या मुळ पावत्या व आम्ही तयार करून आणलेल्या प्रतिज्ञापत्रावर सहया कराव्या लागतील तरच रक्कम मिळेल अन्यथा मिळणार नाही. तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असल्याचे सांगून ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून एजंट, संतोष बाफना याचेकरवी ठेवीदारास ३० ते ४० टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.

५) जयश्री शैलेश मणियार
(रा.इंद्रप्रस्थ एव.एच.नं.६ पोलीस चौकीजवळ पाळधी ता.धरणगाव जि. जळगाव)

सदर आरोपीने बीएचआर पतसंस्था शाखा नवी पेठ जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००३२०७०००४२ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये १,०४,८३,०६०/-पैकी ८९,६७,०६०/ रुपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ५६ मुदतठेव पावत्या ३० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने आता इतकेच पैसे घ्या नाहीतर ते पण मिळणार नाहीत, पतसंस्था बुडाली असून तुम्हाला जास्तीत जास्त ३० टक्के रक्कमच मिळेल त्यासाठी तुमच्या ठेवींच्या मुळ पावत्या व स्टॅम्पपेपरवर तुमच्या सह्या करून तुमचे आधारकार्ड व पॅपकार्ड झेरॉक्स दया तरच रक्कम मिळेल अन्यथा मिळणार नाही. तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असल्याचे सांगून ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून एजंटकरवी ठेवीदारास ३०टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.

६) संजय भगवानदास तोतला
(रा.प्लाट नं. ५२ प्रभा हाऊसिंग सोसायटी, पिप्राळा रोड शाहूनगर जळगाव)

सदर आरोपीने बीएचआर पतसंस्था शाखा नवीपेठ जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००३२०७०००४३ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये १,०२,९३,६७२/-पैकी ९१,४१, १७२/ रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या २१ मुदतठेव पावत्या ३० ते ३५ टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने काहीही झाले तरी तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहीत, मी सांगतो तसे केले तरच ३५ टक्के पर्यंत रक्कम मी तुम्हाला मिळवून देईन आत्ता इतकेच पैसे घ्या नाहीतर ते पण मिळणार नाहीत, पतसंस्था बुडाली असून तुम्हाला जास्तीत जास्त ३५ टक्के रक्कमच करही दिवसांनी मिळेल अन्यथा कसलीच रक्कम मिळणार नाही त्यासाठी तुमच्या ठेवींच्या मुळ पावत्या व आम्ही स्टॅम्पपेपरवर तयार करून आणलेल्या प्रतिज्ञापत्रावर तुमच्या सह्या करून दयाव्या लागतील तरच रक्कम मिळेल अन्यथा मिळणार नाही. तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असल्याचे सांगून ठेवीदारांमध्ये भितीचें वातावरण निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून एजंट अशोक रूणवाल करवी ठेवीदारास ३५ टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.

७) राजेश शांतीलाल लोढा
(रा. संगम सोसायटी रिंग रोड, जळगाव व समर्थ हॉस्पिल जवळ पाचोरा, ता. जामनेर जि. जळगाव)

सदर आरोपीने बीएचआर पतसंस्था शाखा जामनेर जळगाव येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००२२०१०००२६ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये १,०२,१६,१६४/-पैकी ८७.१६.१६४/ रुपये व कर्जखाते क्रमांक ०००२२०१०००२५ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रूपये २९.२८,३९८/- पैकी २३.४३,३९८/- रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या १११ मुदतठेव पावत्या ३० टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना तुम्हाला तुमचे ठेवींचे बदल्यात फक्त ३० टक्केच रक्कम मिळेल मान्य असेल तर बघा अन्यथा पैसे मिळणार नाहीत. असे कंडारे यांचे सांगण्यावरून शिरीष कुवाड यांनी ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करून स्टॅम्पपेपर प्रतिज्ञापत्र तयार करून घेवून मुदत ठेवीच्या मुळ पावत्या कमी किमतीत घेवून जितेंद्र कंडारे याचे मदतीने एजंट करवी ठेवीदारास ३० टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.

८) प्रितेश चंपालाल जैन
(रा. घर नं.४० गट नं. १८५ मालेगाव रोड गुरुव्दाराजवळ धुळे)

सदर आरोपीने बीएचआर पतसंस्था शाखा धुळे येथील त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ००११२०१००००७ मधील एकुण बाकी कर्ज रक्कम रुपये २,१३,३३,६५८/-पैकी १,५१,०९.९२९/- रूपये पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ७४ मुदतठेव पावत्या ३० ते ४२ टक्के रक्कम देवून एजंट मार्फतीने खरेदी करताना त्याने एजंट मार्फतीने काहीही झाले तरी तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहीत, मी सांगतो तसे केले तरच वरीलप्रमाणे रक्कम तुम्हाला मिळवून देईन आत्ता इतकेच पैसे घ्या नाहीतर ते पण मिळणार नाहीत, पतसंस्था बुडाली असून तुम्हाला जास्तीत जास्त ३० ते ४२ टक्के रक्कमच मिळेल अन्यथा कसलीच रक्कम मिळणार नाही त्यासाठी तुमच्या ठेवींच्या मुळ पावत्या व आम्ही स्टॅम्पपेपरवर तयार करून आणलेल्या प्रतिज्ञापत्रावर तुमच्या सह्या करून दयाव्या लागतील तरच रक्कम मिळेल अन्यथा मिळणार नाही. तुमचे पैसे मिळणार नाहीत, संस्था बुडाली असल्याचे सागून ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करून ठेव पावत्या कमी किमतीत घेवून एजंट अशोक रूणवाल, अजय ललवाणी, अनिल पगारीया करवी ठेवीदारास ३० ते ४२ टक्के रक्कम घेण्यास भाग पाडले.

वरील नमूद आरोपीनी सदर पतसंस्थेतुन कर्जाच्या नावाने घेतलेला ठेवीदारांचा पैसा पुर्ण परतफेड न करता पतसंस्थेचे अवसायक पाहिजे आरोपी नामे जितेंद्र गुलाबराव कंडारे, अटक आरोपी सुजित सुभाष वाणी व इतर यांच्याशी संगनमत करून पुर्ण रक्कम परत फेड केल्याच्या खोटया नोंदी करुन ठेवीदारांना केवळ ३० ते ४५ टक्के रक्कम बेकायदेशिररित्या अदा करून महाराष्ट्र मल्टिस्टेट को. ऑप अॅक्ट २००२ चे नियम २९ चे जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर उल्लंघन केले आहे व इतर ठेवीदारांना सुध्दा त्यांच्या कष्टाची व हक्काची रक्कम समप्रमाणात मिळणे आवश्यक असताना या गैरकृत्यामुळे त्यांना वंचित ठेवले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यापुर्वी बांग्लादेशी तरुणीची सुटका

July 26, 2025
जळगाव

मोहाडी टेकडीवर ५००० झाडांचे वृक्षारोपण आणि २ लाख देशी बियांचे बीजारोपण : २७ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रम

July 26, 2025
गुन्हे

जिल्ह्यातील ‘बोगस’ डॉक्टरांची चौकशी होणार !

July 26, 2025
जळगाव

वृक्षारोपण करुन वन संवर्धन दिन साजरा

July 25, 2025
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनच्या जळगाव परिमंडलाची कार्यकारिणी जाहीर

July 25, 2025
जळगाव

5 वर्ष, 57 महिने, 248 आठवडे, 1736 दिवस झालेत, कुठे आहे ती सीडी?” ; मंगेश चव्हाणांचा खडसेंना थेट सवाल !

July 25, 2025
Next Post

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : भाऊबीजेच्या दिवशीच एकुलत्या एक भावाची हत्या !

November 6, 2021

कॅनेरा बँकेची तब्बल १० लाखांत फसवणूक ; चाळीसगाव पोलिसात महिलेविरुद्ध गुन्हा !

September 7, 2022

दूध उत्पादक संस्थांच्या अडीअडचणी अध्यक्षांच्या माध्यमातून मार्गी लावू : अजय भोळे

August 6, 2022

भुसावळमधील अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये सुविधांचा अभाव ; राष्ट्रवादीचे मेमन इक्बाल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

July 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group