जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात तपास मंदावातोय की काय?, अशी चर्चा सुरु होत नाही, तोच पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने आज राज्यभरात तब्बल १२ आरोपींना अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. नवटके मॅडमांनी एकाच वेळी राज्यातील विविध शहरात पाठवलेल्या १५ पथकांचे नेतृत्व करत हे धाडसी अटकसत्र राबवले. दरम्यान, या अटकसत्रामुळे संशयित आरोपींच्या मनात धडकी भरली आहे. तर दुसरीकडे मात्र, ठेवीदार खुश झाले असून नवटके मॅडमांचे अभिनंद करताय.
बीएचआर घोटाळ्यात सुरज झंवरचा जामीन झाल्यापासून हा खटला कमकुवत होणार की, काय अशी चर्चा सुरु झाली होती. कारण एकीकडे मुख्य संशयित सुनील झंवर, जितेंद्र कंडारे पोलिसांना गुंगारा देत होते. तर दुसरीकडे आरोपींचे जामीन मंजूर होत होते. परंतू पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी पुन्हा ‘व्हाईट कॉलर’वाल्यांना जोरदार झटका दिला आहे. अनेक दिवसापासून पासून बीएचआर घोटाळा थंडावल्यागत जाणवत होता. परंतू आर्थिक गुन्हे शाखा आपल्या पद्धतीने तपास करतच होती. आजही नियोजन बद्ध पद्धतीने एकाच वेळी तब्बल १२ संशयित आरोपींना ताब्यात घेत नवटके मॅडमांनी ‘जोर का झटका धीरे सें’ दिलाय.
नवटके मॅडम एकाच वेळी १५ पथकांना अटक करण्यापासून तर झाडाझडती बाबत सूचना करत होत्या. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर संशयितांना अटक झाल्यामुळे बीएचआर घोटाळ्याचे लाभार्थींमध्ये खळबळ उडाली असून आणखी कुणाला अटक झालीय का?. याबाबत इकडून तिकडून माहिती गोळा करत आहेत. दरम्यान, नवटके मॅडमांच्या अभ्यासपूर्ण तपासामुळे आज एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयितांना अटक झाली आहे. दुसरीकडे या घोटाळ्यात येत्या काही दिवसात आणखी बड्या हस्तींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज यांना झालीय अटक
बीएचआर घोटाळ्यात आज पहाटे जळगाव जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई) अशा अटक केलेल्या १२ संशयितांची नाव आहेत.