जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुरज झंवरचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी सूरजच्या जामीन अर्जाविरुद्ध जोरदार युक्तिवाद केला होता. दुसरीकडे जितेंद्र कंडारीच्या जामीन अर्जावर शुक्रवारी निकाल येण्याची शक्यता आहे.
बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर मागील काही महिन्यांपासून पोलीस कोठडीत आहे. सुरज झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ जानेवारीला सायंकाळी अटक केली होती. दरम्यान, बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने विविध बँकांना सुरज झंवर व कुटुंबियांच्या बँक खात्यांची माहिती घेण्यासाठी तसेच ती खाती गोठविण्यासाठी काही बँकांना पत्र दिले होते. परंतू सुरज झवरने बँक खाती गोठवू नका म्हणून बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. दरम्यान, सुरजने संगनमत करून पुणे, निगडी आणि नशिराबाद येथील करोडोच्या मालमत्ता कवडीमोल दरात खरेदी केल्याचेही पोलीस तपासात समोर आले होते.
सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी सुरतच्या जामीन अर्ज विरोधात जोरदार युक्तिवाद केला होता सुरज हा मुख्य सूत्रधार असून त्याच्या कार्यालयात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्र लॅपटॉप सापडले आहेत तसेच मालमत्ता विकणे मध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी अॅड. चव्हाण यांनी न्यायालयाकडे मागणी केली होती. न्यायमूर्ती एस.एस.गोसावी यांच्या न्यायालयात आज कामकाज झाले. दरम्यान, सुरज झंवरला सुप्रीम कोर्टाने नुकताच जोरदार झटका दिला होता. मला देण्यात आलेली नऊ दिवसांची पोलीस रिमांड बेकायदेशीर असल्याबाबत निकाल द्यावा, अशी सुरजची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत अर्जात तथ्य नसल्याचे सांगून योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याच्या सूचना त्याला दिल्या होत्या.