अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघोदे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यात प्रामुख्याने २५१५ योजनेअंतर्गत असलेल्या अंदाजित ६ लक्ष रुपये किंमतीचे सांत्वन शेड बांधणे तसेच अंदाजित १५ लक्ष रुपये किंमतीचे जिल्हा परिषद मराठी शाळेतील संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे या विकासकामांचा समावेश आहे.
यावेळी अशोक पाटील, भटू पाटील, जयदीप पाटील, भिका पाटील, ब्रिजलाल पाटील निसर्डी, तसेच सरपंच चेतन पाटील, उपसरपंच कौशल्याबाई पाटील, सदस्य ज्ञानेश्वर पाटील, आशाबाई पाटील, प्रतिभाताई पाटील, कविता पाटील, अजय भिल, राजमल पाटील, श्रीराम पाटील, काशिनाथ पाटील, विजय पाटील, आधार पाटील, रमेश पाटील, गटलू पाटील, दामू पाटील, विश्वास पाटील, रवींद्र पाटील, जयप्रकाश पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, विशाल पाटील, किरण पाटील, किशोर पाटील, रावसाहेब पाटील, चतुर पाटील, सतीश पाटील, सचिन पाटील, हितेश पाटील, महेश पाटील, मयुर पाटील, स्वप्नील पाटील, दिषांक पाटील, निलेश सैंदाणे, रामचंद्र पाटील, शरद पाटील, भूषण पाटील, अक्षय पाटील, सतीश पाटील, गमन पाटील, विशाल पाटील, लोटन पाटील, सुभाष भिल, अशोक भिल, सतीश पाटील, वनराज सैंदाणे, ग्रामसेवक आर.एन. पाटील, कर्मचारी मच्छिंद्र भील तसेच मंगरूळ, लोंढवे, निसर्दी, खडके या पंचक्रोशीतील पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.