चोपडा (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात रोटरी उत्सव २०२२ करिता जागेचे भूमीपूजन विधीवत संपन्न झाले. यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेला प्रेसिडेंट रोटे. पंकज बोरोले यांनी संबोधित केले.
जीवनाचा आनंद रंगे – रोटरी उत्सवाच्या संगे’ हया थीमनुसार चोपडा रोटरी क्लब ने उत्सव २२ चे आयोजन केले आहे. कृ.उ.बा.स- आवारात रोटे. पंकज बोरोले, दीपाली बोरोले, रोटे. ॲड. रुपेश पाटील, भावना पाटील, रोटे तेजस जैन, नीता जैन यांनी विधीवत भूमीपूजन केले. पवित्र मंत्रोपचारात पुरोहितांनी आरती करून प्रसाद वाटप केले. रोटरी संस्थापक पॉल हॅरिस यांच्या प्रतिमेला जयंतीनिमित्त माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी आयोजित पत्रपरिषदेत उपस्थित पत्रकारांचे स्वागत व सत्कार भेटवस्तु देऊन करण्यात आला. रोटरी प्रेसिडेंट पंकज बोरोले यांनी रोटरी उत्सवाचे महत्व व यात सहभागी व्यावसायीकांना नव्या उद्योग व्यवसायाची चालना व रोजगार निर्मीतीकरिता रोटरी उपक्रमाविषयी सांगितले की, बिझिनेस स्टॉल ४९, प्रिमियम कॉर्नर स्टॉल ३, एकझीकेटीव्ह स्टॉल २, प्रिमियम बिझिनेस स्टॉल १४, प्रिमियम ऑटोस्टॉल ६, खाद्यपदार्थ स्टॉल ६० अशा एकूण १३४ दुकानांद्वारे या उत्सवात ग्राहकांसाठी विक्री तसेच बालगोपालांसाठी हौसमौज व विविध करमणुकीची साधने , खेळण्यांची दुकाने या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. यावेळी रोटे. प्रविण मिस्त्री (मानद सचिव), प्रकल्प प्रमुख रोटे. ॲड. रुपेश पाटील, सह प्रकल्प प्रमुख रोटे. चेतन टाटिया, रोटे.तेजस जैन (खजिनदार) आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमास ज्येष्ठ रोटेरियन डॉ. शेखर वारके, रोटे. आशिष गुजराथी, रोटे. नितीन अहिरराव ,रोटे. डॉ. प्रफुल्ल पाटील, रोटे. डॉ. दुर्गेश जैस्वाल, रोटे.संजीव गुजराथी, रोटे. संतोष बाविस्कर, रोटे.संजय शर्मा, रोटे.पी.बी. पाटील, रोटे.व्ही एस पाटील, रोटे.नंदकिशोर पाटील, रोटे.नरेंद्र तोतला, रोटे.डॉ.नीता जैस्वाल, रोटे.चंद्रशेखर साखरे, रोटे.विलास कोष्टी, रोटे.अविनाश पाटील, रोटे. विपूल छाजेड, रोटे.अरूण सपकाळे, रोटे.प्रदिप पाटील, रोटे. रमेश वाघजाळे, रोटे. पवन गुजराथी, रोटे.महेंद्र बोरसे आदि मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे.ॲड रूपेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रोटे. सागर नेवे यांनी केले तर आभार रोटे. प्रविण मिस्त्री यांनी मानले.