भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबार झाल्याची अफवा पसरल्याने घटनास्थळी पोलीसांची तारांबळ उडाली आहे. याप्रकरणी अद्यापही चौकशी सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत पोहचून परिसराची पाहणी केली. तसेच रजनी रविंद्र खरात यांची समक्ष भेट घेऊन तुमचा मुलगा कोठे आहे ? याबाबत विचारणा केली असता रंजनी खरात यांनी माझा मुलगा औरंगाबाद येथे असल्याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी रंजनी खरात यांना मुलाला फोन लावण्यास सांगितले असता फोन बंद असल्याचे रजनी खरात यांनी सांगितले. या घटनेची शहानिशा करण्यासाठी शहर पोलीस स्टेशन हद्दीत संशयास्पद परिसराची पाहणी केली. तसेच भुसावळ शहरातील हॉस्पिटल व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयमध्ये कुणी इसम उपचार घेण्यासाठी किंवा जखमी अवस्थेत आल्याबाबत तपासणी केली. तसेच ज्या परिसरात गोळीबार झाल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली त्या परिसरात अधिकारी तीन तास कसून चौकशी केली.
दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती कुठलीही माहिती लागली नसल्याने शहरात गोळीबार झाला की अफवा आहे हे नेमके गुलदस्तात आहे ? पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे घटनेचा तपास करीत आहेत.