जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाच्या अंतिम मतदार यादीत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ व संचालक भैरवी पलांडे यांच्या नावावर आक्षेप घेत, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका गुरुवारी न्यायालयाने सकारण फेटाळून लावली. यानिमित्ताने आमदार एकनाथराव खडसे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
नेमकी काय होती याचिका !
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या संदर्भातील अंतिम मतदार यादीत मंत्री गुलाबरावांसह चौघांची नावे आल्याने एकनाथराव खडसे गटाच्या सरोज जितेंद्र चौधरी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पाच याचिका दाखल केल्या होत्या. त्यात गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध दोन, मंगेश चव्हाण, स्मिता वाघ व भैरवी पलांडे यांच्याविरुद्ध प्रत्येकी एक याचिका होती. हे सर्व जण दूध उत्पादक संस्थेत दूध पुरवठादार नाहीत, त्यांचा गावात गोठा नाही, रहिवास नाही किंवा कार्यक्षेत्र नाही. ज्या सदस्यांनी राजीनामा दिला, त्यांच्या जागी यांना दिली. सदस्य करण्यात आले. सदस्य होण्यासाठी आवश्यक प्रक्रियाही राबविण्यात आलेली नाही, त्यामुळे यांची नावे मतदार यादीतून वगळावीत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध), नाशिक यांनी जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीवर खडसे गटाने हरकत घेतली होती. मात्र, त्यांनी म्हणणे ऐकून घेतले नाही, म्हणून खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.
निवडणूक याचिकेत म्हणणे मांडा
खंडपीठाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी याचिका फेटाळताना याचिकाकर्त्याांना दाखल केलेले मुद्दे निवडणूक याचिकेत मांडता येतील, आता कागदावर आलेल्या बाबी खया किवा खोट्या हे आता ठरविता येणार नाही. त्यासाठी आपण याचिका मागे घ्यावी, अन्यथा याचिका फेटाळली जाईल, असे खंडपीठाने गुरुवारी सांगितले होते. त्यावर खडसे गटाने वेळ मागितला होता. शुक्रवारी याचिका मागे घेण्यास नकार दिल्याने खंडपीठाने सकारण देऊन याचिका फेटाळून लावली.