मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या उपचारासाठी अति महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारही समोर येत आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरून राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीरची चढ्या दरात विक्री केली जात आहे. त्यामुळे हा गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम उभारण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
सध्या राज्य कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या परिस्थितीचा फायदा घेत खाजगी दुकानदार वाढीव दराने रेमडेसिवीरची विक्री करत आहेत. त्यामुळे आता संबंधित दुकानदारांच्या वसुलीबाजीची तक्रार करणं सोपं झालं आहे. येथून पुढे ऑक्सिजन कंट्रोल रूममध्येच रेमडेसिवीरबाबतच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. परिणामी राज्यात कुठेही रेमडेसिवीरबाबत गैरप्रकार आढळला तर जवळच्या ऑक्सिजन कंट्रोलकडे तक्रार दाखल करता येणार आहे.
रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. त्यात खासगी दुकानदार जास्त किंमत लावत आहेत. त्यामुळे सध्या ऑक्सिजन कंट्रोल रूममध्ये रेमडेसिवीरबाबत तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. त्याचे निराकरण स्थानिक FDA च्या कार्यालया मार्फत होणार आहे. जिल्हा स्तरावर तांत्रिक समिती गठीत करून त्या मार्फत रॅन्डम पद्धतीने खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर उपयोग नीट होत आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. रेमडेसिवीरची गरज भासल्यास राज्यस्तरावरील FDA च्या कंट्रोल रूमशी संपर्क करून कारवाई होणार आहे. जिल्हास्तरावर यासाठी कंट्रोल रूम स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.
रेमडेसिवीरबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून समितीची घोषणा करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात कंट्रोल रूम कार्यरत होणार आहे. रेमेडेसिवीरच्या वापरलेल्या बॉटल नष्ट करता येणार नाहीत. समितीने तपासणीसाठी मगितल्यांनंतर रिकाम्या बॉटल्स दाखवाव्या लागणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.