जामनेर (प्रतिनिधी) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेन शाखेत अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अतुलयकुमार रामजीवन साहू (वय ४० रा. प्लॉट नं. बी १५ संकल्प अपार्टमेंट इंदिरानगर नाशिक ता. जि. नाशिक ह. मु. भारतीय स्टेट बँक मेन शाखा जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. जून २०२२ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने वाकी रोड जामनेर येथील भारतीय स्टेट बँक मेन शाखा मधील मागील दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील हे करीत आहेत.