मुंबई (वृत्तसंस्था) भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निवास्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणेज खासदार पाटील यांच्यासोबत पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करन पवार हे देखील होते.
याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. या वृत्तानुसार भाजपचे जळगावमधील विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. उन्मेश पाटील यांनी संजय राऊतांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे भाजप खासदार उन्मेश पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटात प्रवेश करण्यासंदर्भात उन्मेष पाटील हे आधी संजय राऊत यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याचेही ‘एबीपी माझा’ने म्हटले आहे.
उन्मेश पाटील यांनी भांडुपमधील संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानी भेट घेतली. जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याची माहित आहे. उन्मेश पाटील यांच्यासोबत पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील राऊतांची भेट घेतली. करण पवार यांच्या उमेदवारीसाठी उन्मेष पाटील आग्रही असल्याचे कळते. अगदी आगामी दोन दिवसात करण पवार यांची लोकसभेची ठाकरे गटाकडून जाहीर होणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, ‘सरकारनामा’ने तर दोघांचा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी प्रवेश होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. थोड्याच वेळापूर्वी उन्मेष पाटील हे मातोश्रीवर पोहोचल्याचे वृत्त काही न्युज चॅनेलने दिले आहे.