मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे. याआधी ठाकरे गटाने 17 जणांची उमेदवार यादी जाहीर केली होती.
ठाकरेंची दुसरी उमेदवार यादी
जळगाव – करण पवार
कल्याण लोकसभा – वैशाली दरेकर
हातकणंगले – सत्यजीत पाटील
पालघर – भारती कामडी
करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष नव्हेच तर शरद पवार गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे आहेत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात अनेक मित्र आहेत. तसेच गतवेळी स्मिताताई वाघ यांच्या उमेदवारीला विरोध करून तिकीट रद्द करायला लावणारा भाजपातील नाराज गट देखील करण पवार यांना मदत करेल. तसेच खासदार उन्मेष पाटील हे करण पवार यांच्यासोबत उभे राहिल्यास त्यांना भाजपने लोकसभेसाठी तयार केलेली सर्व रणनीती आपोपाप वापरायला मिळेल. अगदी खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर होईल, या अपेक्षेने भाजपच्या रणनीतीनुसार उभी केलेली यंत्रणा करण पवार यांनी ‘रेडी टू युज’ मिळेल, अशी शिवसेनेची रणनीती आहे.