मुंबई (वृत्तसंस्था) बारावीच्या निकालाची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावी निकालाची तारीख (HSC Result 2022 Date) जारी करण्यात आली असून उद्या म्हणेजच 8 जून रोजी 12 वीचा निकाल जाहीर (Maharashtra 12th Result Announced) केला जाणार आहे.
असा पाहता येईल बारावीचा निकाल
- बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर होमपेजवरील निकाल या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- क्लिक केल्यास एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल
- त्यानंतर महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा
- इथे लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा
- सर्व प्रकिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा
बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.