पाटणा (वृत्तसंस्था) बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. सध्या त्यांना पटनाच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत होती. कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, कोणतीही अडचण नाही, मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. सध्या पाटणामधील एम्स रुग्णालयात दाखल झालो असून सीटीस्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती सुशीलकुमार मोदींनी दिली.
कोरोनातून बरं होऊन लवकरच पुन्हा बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार असल्याचे सुशीलकुमार मोदींनी म्हटले. सुशीलकुमार मोदी बिहारमधील महत्वाचे नेते आहेत. भाजपने आजचं बिहार निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 आक्टोबरला होणार आहे. भाजप आणि जदयू एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात आहे.
















