धरणगाव (प्रतिनिधी) उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकून दुचाकीवरील वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना दि.१७ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. याबाबत वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन न केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंबरसिंग वामन पाटील (वय ६७ वर्ष .रा.लोणे ता. धरणगाव), असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि.१७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसाह वाजेच्या सुमारास गंबरसिंग पाटील हे लोणे येथुन शेतातील फवारणीचे औषधी घेण्यासाठी धरणगाव येथे त्यांच्या बजाज कंपनीची प्लॅटीना मोटर सायकल (क्रं.MH १९ DD ६१८) ने जात होते. धरणगाव ते अमळनेर रोडवर दत्त टेकडी समोर रोडवर एक हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर (क्र.MH १९ EA ७६६२) त्यास जोडलेले ट्रॉली )(क्रं.MH १९ E ३३६०) चे टायर पंचर झालेले असल्याने रोडवर उभे केलेले होते. सदर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागे कुठलेही रिफ्लेक्टर लावलेले नव्हते.
एवढेच नव्हे तर, ट्रॅक्टरच्या आजुबाजुला कुठल्याही झाडाच्या फांद्या, दगड ठेवलेले नव्हते. सदरचे ट्रॅक्टर रोडवर रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे मानवी जिवीतास धोका निर्माण होईल, असे धोकादायक पद्धतीने उभे केलेले होते. त्यामुळे अंधार असल्याने मोटर सायकल सदर ट्रक्टरच्या ट्रॉलीवर मागुन धडकल्याने चालक वृद्धाचा डावा पाय मोडुन, तोंडाचे, नाकाचे गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी राजेंद्र गंबरसिंग पाटील (वय ४१, धंदा शेती रा. लोणे) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक भूषण अजीत पाटील (रा. भडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत.