भुसावळ प्रतिनिधी । आज (दि.2) ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने जळगाव रोडवरील गांधी पुतळ्याजवळ महात्मा गांधी जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, खा. रक्षाताई खडसे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमणभाऊ भोळे, प्रा. सुनीलजी नेवे, माजी प्रदेश सरचिटणीस ओबीसी सेल अजय भोळे, प्रदेश वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.निलेश पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत होते.
याप्रसंगी स्व.महात्मा गांधी यांना अभिवादन करुन महात्मा गांधी पुतळा परिसराची साफ़सफाई करण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, तालुकाध्यक्ष भालचंन्द्र पाटील, शहर सरचिटणीस पवन बुंदेल, अमोल महाजन, तालुका सरचिटणीस दिलीप कोळी, शैलजा पाटील, नगरसेवक परिक्षीत बर्हाटे, प्रमोद नेमाडे, वसंतदादा पाटील, किरण कोलते, राजुभाऊ नाटकर, किशोर पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, विशाल जंगले, प्रशांत नरवाडे सर.कुंदन ढाके.गणेश माळी. प्रमोद सावकारे, प्रशांत पाटील, खुशाल जोशी, प्रविण इखनकर, बिसन गोहर, राजु खरारे, अनिरुद्ध कुलकर्णी, नंदू बडगुजर, चेतन बोरोले, संदीप सुरवाडे, सुरेश कुटे, नारायण रणधीर, रमाशंकर दुबे, सुनील महाजन आणि भारतीय जनता पार्टीचे समस्त पदाधिकारी, नगरसेवक, सक्रिय कार्यकर्ते आणि भाजपाच्या विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.