लंडन (वृत्तसंस्था) भाजपने देशभर रॉकेल ओतलं आहे. तुम्हाला एक ठिणगी हवी आहे आणि आपण मोठ्या संकटात पडू, अशी टीका राहूल गांधींनी (Rahul Gandhi) भाजपवर (BJP) केली आहे. लंडनमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.
लंडनमधील कॅम्ब्रिज विद्यापीठात आयडिया फॉर इंडिया या कार्यक्रमात राहुल गांधींनी आपले विचार व्यक्त केले आहेत. यावेळी भारतातील लोकशाहीबद्दलही भाष्य केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर त्यांनी गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, भारताची स्थिती चांगली नाही. भाजपने देशभर रॉकेल ओतले आहे. तुम्हाला एक ठिणगी हवी आहे आणि आपण मोठ्या संकटात पडू. भाजपने वाढवलेले हे तापमान आपल्याला कमी करणे आवश्यक आहे. कारण हे तापमान कमी झाले नाही तर सर्व काही चुकीचे होऊ शकते असं राहुल गांधी म्हणाले आहे. त्याचप्रमाणे हे तापमान कमी करण्यासाठी लाेकांना, समुदायांना, राज्यांना आणि विविध धर्मांना या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी विरोधी पक्षांची आणि काँग्रेसचीही ही जबाबदारी आहे असे मला वाटते असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, ज्या संस्थांनी देशाची उभारणी केली, त्यांच्यावर होणारे हल्ले भारतातील जनता पाहत आहे. या संस्था आता डीप स्टेटच्या ताब्यात आहेत. सीताराम येचुरी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, आरजेडी नेते तेजस्वी यादव, महुआ मोइत्रा आणि मनोज झा यांच्यासह अनेक विरोधी नेते राहुल यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित आहेत