जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात आगामी काळात युती होऊ शकते, असे संकेत भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी दिले आहेत.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना महाजन म्हणजे आहेत की, ”राज ठाकरे हिंदुत्वाचे विचार मांडत आहे. वरिष्ठ पातळींवर निर्णय होईल, पण मनसे सोबत भाजपाची युती होऊ शकते.” यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले आहेत की, राज ठाकरे हिंदुत्वावर बोलत आहेत, हे चांगलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात स्पर्धा आहे. उद्धव ठाकरे म्हणतात राज यांचं हिंदुत्व हे बनावटी आहे. ते बनावटी हिंदू हृदयसम्राट बनायचं प्रयत्न करतायत, असं उद्धव ठाकरे म्हणत आहे. मात्र कोण ओरिजिनल कोण डुप्लिकेट हे जनता ठरवणार. वेळेवर निवडणुकीत त्यांना त्याचं उत्तर मिळणार आहे, असं महाजन म्हणाले.
भाजप आणि मनसे यांच्या युतीबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले आहेत की, राजकारणात काही अशक्य नाही. हा सर्व प्रश्न आमच्या वरिष्ठांचा आहे. ते त्याबद्दल निर्णय घेणार. ते म्हणाले आहेत की, आमचे वरिष्ठ ठरवणार ते आम्हाला मान्य असेल.