मुक्ताईनगर (प्रतिनिधी) पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्ते तसेच भाजपा समर्थकांच्या हत्या, जिवघेणे हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. या हिंसाचाराचा भाजपा मुक्ताईनगरतर्फे तीव्र निषेध कारण्यात येऊन खासदार रक्षाताई खडसेंच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, जि.प.सभापती जयपाल बोदडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, नगरसेवक ललित महाजन, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, प.स.सदस्य राजेंद्र सवळे, विनोद पाटील, विजय काठोके, सौरव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.