जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असुन अर्ज भरण्यास सुरूवात देखील झाली आहे. दुसरीकडे मनपा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ थांबले असुन महायुतीमधील भाजप आणि भाजप-शिवसेना शिंदे गटाने युतीची घोषणा केली आहे. तसेच राष्ट्रवादीशी देखील चर्चा केली जाईल त्यानंतर जागा वाटपाचा फार्मुला निश्चित केला जाईल अशी माहीती आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे महायुतीतील कार्यकत्यांमधील संभ्रम दूर झाला आहे.
जळगाव एमआयडीसी परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिता वाघ, माजी महापौर नितीन लढा, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, आ.चंद्रकांत सोनवणे आणि आमदार अमोल पाटील यांसह दोन्ही पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीशी चर्चा सुरूः लवकरच जागा वाटपाचा फार्म्युला : ना. गुलाबराव पाटील
जळगाव शहराच्या विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्र लढणार असून जागावाटपाचा आणि सत्तेचा ‘फॉर्म्युला’ देखील निश्चित झाला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र महायुतीमधील तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. राष्ट्रवादीसोबत स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे, असा विश्वास यावेळी भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीशी बोलणीनंतर जागांची घोषणा
भाजपाचे प्रभारी मंगेश चव्हाण, आ. राजूमामा भोळे व शिवसेनेकडून दोन पदाधिकारी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाशी बोलणी करणार आहे. चर्चा झाल्यानंतर एकंदरीत जागा निश्चिती करून त्याची घोषणा करू असे आ.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
















