धुळे (प्रतिनिधी) आपल्या पक्षाचे १०५ आमदार निवडून आल्यानंतरही विरोधात बसण्याची नामुष्की भाजप नेतृत्वाला पत्करावी लागली याचे दुःख देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीला अजूनही पचवता आले नाही. यासाठी भाजपाचे राज्य पातळीवरील नेते रोज उठून रोज नवे नवे आरोप करुन राज्यातील जनतेची दिशाभूल करुन आपले मानसिक समाधान मिळवित आहेत. पण यामुळे जनमाणसामध्ये भाजपाची प्रतिमा दिवसागणिक कमी होत आहे. अशी टीका धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
धुळ्याचे माजी आमदार यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हंटले आहे की, परमबीर सिंग यांच्या पत्रस्फोटामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा सादर करावा लागला, या कटकारस्थानात यश मिळण्याचे आत्मसमाधान करुन भाजपाने सचिन वाझेकडून दुसरे पत्र लिहून घेतले. हे सर्व गुन्हेगारी कारस्थान देवेंद्र फडणवीसांच्या कपटी स्वधावाचा भाग आहे.
नाथाभाऊ खडसे यांनी दाऊद इब्राहिमच्या बायकोला फोन केला, देशद्रोहाच्या बायकोबरोबर सरळ संबंध जोडले यासाठी भंगाळे नावाच्या हॅकरचा बळी दिला. या आरोपास बळ देण्याकरीता नाथा भाऊचा एक कपीत पी.ए. तयार करण्यात आला. सदर पीए नाथाभाऊंच्यावतीन कोट्यावधी रुपये गोळा करतो, हे सिध्द करण्यासाठी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांचा वापर तत्कालीन गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिशय निर्धास्तपणे वापर करुन आपण राजकीय स्पर्धक संपवण्यासाठी आपण किती नीच पातळीवर जाऊ शकतो. हे महाराष्ट्राला दर्शन दिले, या प्रकरणातही फडणवीसांनी सनदी अधिकान्यांचा वापर करुन घेतला. परमबीर सिंग प्रकरणातही दुकारे तिसरे काहीही झालेले नाही शिवसेनेचे व वाझेचे मधुर संबंध फडणवीसांना माहिती होते. देवंद्र फडणवीसांनी परमबीर सिंगाणा हत्यार म्हणून वापर केला.
अर्णव गोस्वामी न सुशांतसिंग राजपूत प्रकरणात दुखावलेल्या भाजपला मदत करण्याच्या प्रयत्नात परमबीर सिंग हे स्वतःच त्यांनी खोदलेल्या खड्यात अलगद जाऊन पडले केंद्रात भाजपाचे सरकार आहे. देवंद्रचे जेष्ठ बंधू अमित शहा गृहमंत्री आहेत. सी.बी आय चौकशीची मागणी केली तर, केंद्रातून आम्ही मदत करु ! अशा अटी शतीवरच लेटरबॉम्ब फोडला असावा, सर्वाच्च न्यायालयाचा फटका फुसका निधाल्यानंतर मग जे सर्वोच्च न्यायालयात जमले नाही ते उच्च न्यायालयात घडवून आणले. जी व्यक्ती आपल्या चाळीस वर्षाच्या सहकाऱ्यांच्या निर्दयपणे गळा कापू शकते ती व्यक्ती हिरावून घेतलेली सत्ता मिळविण्यासाठी कुठल्याही निच्चतम स्थरास जावू शकते. याची मला शंभरटक्के खात्री आहे.
यातील दुर्दैवाचा भाग असा की, महाराष्ट्राचे पोलीस हे राजकीय पक्षांचे वसूली अधिकारीही आहेत. अशी जी पोलीसांची प्रतिमा रंगविली जात आहे, हे वाईट आहे. परमबीर सिंगानी म्हणायचे सचिन वाझे यांना शंभर कोटीचे टार्गेट दिले होते. सचिन वाझेंनी सांगायचे मला दोन कोटी मागितले होते. महाराष्ट्राच्या पोलीस अधिकान्यांना पोलीसाचे काहीही काम नाही फक्त राजकीय नेत्यांसाठी खंडण गोळा करण्याचा एक्वीच जबाबदारी पोलिसांनी पार पाडायची आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या गृहमंत्री पदाच्या काळात पोलीस यंत्रणांचा किती गैरवापर केला ” याची सद्यांत माहीती महाराष्ट्राच्या भल्यासाठी मला जनतेसमोर आणण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहिलेला नाही, अर्थात हे फार दुःख दायक आहे. पण मला ते करावेच लागेल ! असेही पत्रकात अनिल गोटे यांनी शेवटी म्हटले आहे.