भोपाळ (वृत्तसंस्था) थेट नगराध्यक्षपदाचा निर्णयामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले असून मध्य प्रदेशातील सात नगरपालिकांमधील सत्ता त्यांना गमवावी लागली आहे.
मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला. कमलनाथ यांच्या काळातील निर्णय बदलल्यामुळं भाजपला फटका बसला आहे. रीवा, कटनी, मुरैना, छिंदवाडा, ग्वाल्हेर, सिंगरौली आणि जबलपूरमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. यानुसार भाजपनं १६ पैकी ७ नगरपालिकांमधील सत्ता गमावली आहे.
१६ नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपचे ९, काँग्रेसचे ५ आणि आम आदमी पार्टीला एक आणि अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. काँग्रेसच्या ताब्यात या १६ नगरपालिकांपैकी एकही नगरपालिका नव्हती. मात्र, थेट नगराध्यक्षपद निवडणूक पद्धतीचा फायदा भाजपला होण्याऐवजी काँग्रेसला झाला आहे. भाजपनं काँग्रेसच्या कमलनाथ यांच्या काळातील नगरपालिकांमधी नगराध्यक्ष निवडणुकीची पद्धत बदलली त्यामुळं हे घडलं. जर, कमलनाथ यांचा निर्णय बदलला नसता तर भाजपे १६ नगरपालिकांपैकी १५ ठिकाणी नगराध्यक्ष बनले असते.
















