जळगाव (प्रतिनिधी) अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्यासह कायदेशीर कारवाईची धमकी देत एका व्यक्तीकडून तब्बल ५ लाख ८१ हजार ८० रुपये उकळल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपा, आयपीएस प्रेमप्रकाश आणी मनजितसिंग अशी पलीकडून फोनवर धमकी देत पैसे उकळणा-या तिघांची कथित नावे आहेत.
जळगाव शहरातील एका परिसरातील राहणा-या नोकरदार व्यक्तीला त्याच्या व्हाटसअॅप क्रमांकावर दि. ४ ते ८ फेब्रुवारीच्या दरम्यान पलीकडून अनोळखी क्रमांकावरुन व्हीडीओ कॉल आले होते. आलेल्या अश्लिल व्हिडीओ कॉलमुळे या नोकरदार व्यक्तीच्या भावना कामोत्तेजक करण्यात आल्या. दरम्यान, इकडून बोलणा-याचा नग्न व्हिडीओ व्हायरल झाला असल्याचे नंतर त्याला सांगण्यात आले. हा व्हिडीओ डीलीट करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. तसेच व्हिडीओ डीलीट न केल्यास पलीकडून आयपीएस बोलत असल्याची बतावणी करुन कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली. रुपा, आयपीएस प्रेमप्रकाश आणी मनजितसिंग अशा तिघांनी मिळून तिघांनी मिळून बदनामीचा सापळा रचून नोकरदार व्यक्तीला घाबरवून सोडत तब्बल ५ लाख ८१ हजार ८० रुपये उकळले.
घाबरलेल्या नोकरदाराने व्यक्तीने तिघं बदमाशांनी दिलेल्या विविध बॅंकाच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवले. त्यानंतरही त्यांनी पैशांची मागणी सुरुच ठेवली. शेवटी पिडीत व्यक्तीने व्हाटसअॅप मेसेज आणि बनावट नावे सांगून पैशांची मागणीसह धमकी देणा-या तिघांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करत आहेत.