चोपडा (प्रतिनिधी) दि.२० जुलै २०२३ गुरूवार रोजी वेळोदे येथील श्रीराम मंदीर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नेताजी सुभाषचंद्र बोस शाखा, वेळोदे व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्वप्रथम प्रभू श्रीरामांचे पूजन करून आणि भारत माता, गोळवलकर गुरुजी, डॉ. हेडगेवार व छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रक्तदानासाठी अनेर परिसरातील गलंगी, घोडगाव, हिसाळे, भवाळे, कूसुंबे, अनवर्दे, दगडी, मोहीदा, विटनेर व वेळोदे येथिल रक्तदात्यांनी रक्तदानाचे मौलिक कार्य केले. तसेच गुरुदत्त टेन्ट हाऊस, वेळोदे व गोळवलकर रक्तपेढीचे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
सरतेशेवटी डॉ वैद्य यांनी सिकलसेल व थैलेसिमिया अशा गंभीर आजारांविषयी मार्गदर्शन केले व रक्तदानाचे जीवनात काय महत्त्व आहे, याबद्दल सविस्तर माहिती दिली. रक्तदानामुळे कोणत्याही अज्ञात इसमाचे प्राण वाचवायला आपले रक्त कामी येऊ शकते. त्यावेळी संबंधित इसमाचे परिवार वाले आपणास दुवा आणि आशिर्वाद देत राहतो. तसेच दर तीन महिन्यानंतर आपण रक्तदान करू शकतो. यासाठी न घाबरता आपण रक्तदान करू शकता, असेही प्रतिपादन डॉ. वैद्य यांनी केले. यावेळी सर्व रक्तदात्यांचे वेळोदे शाखेने आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी व कार्यकर्ते बंधूंनी परिश्रम घेतले.