मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसरकाने सोमवार (दि. २३) पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनाविष्णुच्या पार्श्वभूमीवर शाळांनीही तयारी सुरु केली आहे. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग लवकरच सुरु केले जाणार आहेत. बहुतांश शाळांनी पालकांकडून “आपण स्वत:च्या जबाबदारीवर आमच्या पाल्याला शाअळेत पाठवत असल्याचे’ घोषणापत्र लिहून घ्यायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, केल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येताच, मुंबई महानगरपालिकेनं नवीन निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (23 नोव्हेंबर) मुंबईत एकही शाळा सुरू होणार नाही. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व सरकारी, खासगी शाळा बंदच राहातील, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत इक्बाल चहल बोलत होते.