बोदवड (प्रतिनिधी) बोदवड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. माधव वराडे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.
कार्यक्रमात उपाध्यक्ष,अजय जैन ,अँड. प्रकाशचंद सुराणा,श्रीराम बडगुजर, अशोक जैन ,रवींद्र माटे,उपप्राचार्य डॉ. विनोदकुमार चौधरी ,पर्यवेक्षक जे . एन माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. माधव वराडे त्यांच्या पत्नी सीमा वराडे आणि मुलगी स्मिता यांचा संस्थेचा वतीने आणि महाविद्यालयाच्या परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. अजय पाटील, शेखरसिंग चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मिठूलाल अग्रवाल यांनी वराडे सरांच्या कार्यकाळात पुस्तकांची व वाचकांची संख्या वाढवली ,असे गौरवोद्गार काढले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. प्राचार्य अरविंद चौधरी यांनी ग्रंथपाल म्हणून जबाबदारी सांभाळत असतांना त्यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांना वाचण्यासाठी नेहमीच प्रवृत्त केले. वेळोवेळी ग्रंथप्रदर्शन भरविले. विविध ग्रंथ साहित्य, नियतकालिके, संदर्भ ग्रंथ, क्रमिक पुस्तके वाढविली.
गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी योजना,बुक रिव्ह्यू योजना, सुसज्ज वाचनकक्ष निर्माण केला. नँकच्या संदर्भात .ग्रंथालयाची सर्व कामे केलीत असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गीता पाटील यांनी केले सूत्रसंचालन नरेंद्र जोशी ,डॉ. रूपाली तायडे यांनी केले आणि आभारप्रदर्शन डॉ. मनोज निकाळजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.