बोदवड (प्रतिनिधी) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( १२वी ) च्या परीक्षेत बोदवड एज्युकेशन सोसायटी संचलित न. ह.रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींनी या वर्षी सुद्धा घवघवीत यशाची परंपरा कायम राखली.
या वर्षी कनिष्ठ महाविद्यालयात एकूण ४८१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यातील कला शाखेचा निकाल ७५.१२ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९३.१६ टक्के व विज्ञान शाखेचा निकाल ९८.७४ टक्के लागला. कला वाणिज्य व विज्ञान शाखेत तालुक्यातून अग्रवाल आशिष अजय हा विद्यार्थी ९०.१७ टक्के मिळवून बोदवड तालुक्यातून प्रथम आला. कला शाखेत प्रथम कु. बोदडे पायल विनोद ७९.५० टक्के, द्वितीय कु.सावकारे आदिती दीपक ७६.३३ टक्के तृतीय कु.पाटील भाग्यश्री दिनकर ७५.१७ टक्के तर वाणिज्य शाखेत प्रथम अग्रवाल आशिष अजय ९०.१७ टक्के द्वितीय कु.खाचणे प्रचिती प्रवीण८६ टक्के तृतीय कु. चौधरी कल्याणी संजय ८१.१७ टक्के व विज्ञान शाखेत प्रथम चौधरी निषाद मधुकर व कु.पाटील साक्षी भगवान ८७ टक्के द्वितीय कु.पाटील साक्षी विजय ७०.८३ टक्के तृतीय कु.पाटील मानसी अनिल ७०.६६ टक्के अश्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
इयत्ता बारावीच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन ,सचिव विकास कोटेचा माजी चेअरमन प्रकाशचंनद्र सुराणा व सर्व संचालक मंडळ संस्था सदस्य तथा मुख्याध्यापक पी. एम. पाटील ,उपमुख्याध्यापिका एम. एस.बडगुजर , उपप्राचार्य सौ. नेमाडे ,पर्यवेक्षक तायडे, जे. एन. माळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन व कौतुक केले. पुढील यशाबद्दल अभिष्टचिंतन केले.