TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद

vijay waghmare by vijay waghmare
July 4, 2025
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि.४ प्रतिनिधी – रंग, रूप, वेश, भाषा हे आपल्या मनाप्रमाणे असेल असे नाही ते आपल्या हातात नाही, मात्र माझ्या हातातून घडणारी एखादी कृती ही जगात बदल घडवू शकते. अंधारात दीपक ज्याप्रमाणे प्रकाशाचे कार्य करतो तशी मनाची भावना आपल्याला सुंदर करते, त्यासाठी बाह्य स्वरूपाचा विचार न करता मनाची सुंदरता कशी वाढेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असा प्रेरणादायी संवाद अनुभूती रेसिडेंशियल स्कूलच्या विद्यार्थ्यांशी स्मिता पाटील-वळसंगकर यांनी साधला.

अनुभूती रेसिडेंशियल स्कूलच्या असेंम्बली हॉल मध्ये झालेल्या सुसंवादाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य देबाशिस दास, स्मिता पाटील-वळसंगकर, गिरीष कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला विद्यार्थ्यांनी नवकार मंत्र म्हटला. यानंतर स्मिता पाटील-वळसंगकर यांनी विद्यार्थ्यांशी गृप अॅक्टीव्हिटी घेतली. संवादाविषयी दैनंदिन वातावरणात स्वत:च्या मनात निर्माण झालेले प्रश्न, ते ताणतणाव करणारे असतो की करिअरबद्दल असो ती स्टिकी नोटवर लिहून, चार्ट पेपरवर विद्यार्थ्यांनी चिकटवले. यानंतर शॉर्टफिल्म दाखविण्यात आली. त्यातून ‘Me Indifferent, Fall, Different, Hope’ म्हणजे, मी निर्दयी, अयशस्वी होणे, वेगळेपण सिद्ध करणे, आशावादी राहणे ह्या विषयावर चर्चात्मक भाष्य करण्यात आले. आपल्याशी दुसऱ्याने जसे वागले पाहिजे, तसे वाटणे या विचारातूनच आपण वागले पाहिजे. चुक झाली तर पश्चातापातून विधायक कृती घडली पाहिजे. स्क्रीन टाईम, सोशल कनेक्टीव्हीटी, झोप, योग्य आहार, व्यायाम, खेळणे, अभ्यास, नवीन काही शिकणं, निरपेक्ष काम, दुसऱ्यांविषयी कृतज्ञता यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली.
अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

READ ALSO

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

चौकट…

गरज, सोय, चैन ओळखून उपलब्धता करावी

स्मिता पाटील-वळसंगकर यांनी दुपारच्या सत्रात नव्याने सुरू झालेल्या अनुभूती विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या पालकांशी प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधला. यावेळी मनोज परमार, गिरीष कुलकर्णी उपस्थित होते. पालकांनी मुलांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. जे द्यायचे आहे ते शिस्तीतून दिले पाहिजे. गरज, सोय व चैन या तीन गोष्टींचा विचार करुन ती उपलब्ध करुन द्यावी. कौटुंबिकस्तरावर आपल्या पाल्याच्या भल्यासाठी आठवड्यातून एकदा मिटींग घेतली पाहिजे. मुलांशी मुलाप्रमाणेच संवाद साधावा, मन शांत असेल तरच बदल घडू शकतो. त्याला सुरक्षित भासेल असा संवाद असावा. ‘गूड टच बॅड टच’ या शब्दप्रयोग ऐवजी ‘सेफ आणि अन सेफ टच’ वापरावा. मुलांना खूप सार्‍या गोष्टींचे आकर्षण असते, त्यांना अनेक प्रश्न असतात. त्यासाठी त्यांच्याशी संवाद गरजेचा आहे. पालकांनी अपडेट असले पाहिजे. काळासोबत जायचे असेल तर पालकत्व समजून घेतले पाहिजे. मुलांना त्यांची त्यांची कामे करू द्यावी. त्यांना सवय लावली पाहिजे त्यातूनच त्यांना शिस्त लागते. खाण्या-पिण्याच्या सवयी यावर लक्ष दिले पाहिजे. फास्ट फूड आणि जंक फूड पासून मुलांना दूर ठेवले पाहिजे. कोणतेही काम करताना मुलांना सोबत घेतले पाहिजे असे मार्गदर्शन असे स्मिता पाटील-वळसंगकर यांनी केले. रविंद्रनाथ टागोरांच्या ‘आम्ही आकाश बघू.. आम्ही झाडं बघू..’ ह्या प्रार्थनेने समारोप झाला.

फोटो कॅप्शन –
(IMG_6422) – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना स्मिता पाटील-वळसंगकर.
(IMG_6450) – अनुभूती विद्यानिकेतन स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसमवेत स्मिता पाटील-वळसंगकर, मनोज परमार आदी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
Next Post

जळगावात 'आत्मोत्कर्ष चातुर्मास'चा मंगल प्रवेश उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ई – पीक पाहणी ऍपद्वारे पिक पेरा नोंदण्याची आमदार सुरेश भोळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

August 29, 2022

नाशकात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; चित्रपटसृष्टीत ४ महिलांचा समावेश

June 27, 2021

शिक्षक वक्ता, नेता व अभिनेता असावा ; प्रा. वा.ना. आंधळे याचं प्रतिपादन !

February 7, 2023

धुळ्यातील भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ ; भाजप नगरसेवकाचा आरोप

December 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group