TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

vijay waghmare by vijay waghmare
October 10, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

धरणगाव (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व एरंडोल येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सद्गुरू गोविंद महाराज संस्थेच्या तळई माध्यमिक विद्यालयाचे नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व पेढे भरवून सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील तळई येथील तळई माध्यमिक विद्यालयाच्या संस्थेची त्रिवार्षिक निवडणूक यंदा अत्यंत प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी ठरली. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत सभासद मतदारांनी परिवर्तन पॅनलला स्पष्ट कौल देत संस्थेच्या इतिहासात प्रथमच एकूण १५ पैकी १५ जागांवर विजय मिळवत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना विजयी केले.
या निकालामुळे तळईच्या संस्थात्मक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत एकतर्फी यश संपादन केले. त्यामुळे सभासद मतदारांचा कौल आणि त्यांची भूमिका स्पष्टपणे समोर आली आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदी यशवंत खुशाल पाटील, उपाध्यक्षपदी मोहन राजाराम वाघ आणि सचिवपदी राजेंद्र वामन चौधरी तसेच संचालकपदी दिपक सुरेश पाटील, स्वप्निल भास्कर पाटील (सोनू पेंटर), वाल्मीक प्रकाश सोनवणे (लाला), वसंत बुधा चौधरी, विशाल ईच्छाराम वाघ, पांडुरंग दत्तात्रय पाटील, गोपाल धनराज पाटील, प्रकाश नामदेव तामस्वरे, सत्यवान सुरेश पाटील, हेमराज श्रावण गायकवाड, दिलीप रामदास कंखरे, कैलास बळीराम पाटील यांची निवड झाली.
तळई माध्यमिक विद्यालयाच्या संस्थेच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच एकाच पॅनलने सर्व १५ जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी नवी दिशा निश्चित झाल्याची चर्चा सभासद व नागरिकांमध्ये होत आहे.
ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. मतदानाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडल्यानंतर मतमोजणी करण्यात आली आणि निकाल जाहीर करण्यात आला. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडल्याबद्दल निवडणूक अधिकारी व्ही. बी. पाटील सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सभासद व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
तळईमध्ये यापुढे ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विद्यालय संस्थेच्या निवडणुकीतील हा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, गावातील नागरिकांमध्ये परिवर्तनाच्या नांदीची ही सुरुवात आहे का?, अशी चर्चा सुरू असून, तळईमध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. काही नागरिक या वातावरणाची तुलना यापूर्वीच्या विविध राजकीय निवडणुकांमध्ये चर्चेत आलेल्या लाटेशी करत आहेत. मात्र या निवडणुकीतील कौलाचे प्रत्यक्ष राजकीय प्रतिबिंब आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कसे उमटते, हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे. सर्व १५ जागांवर विजयी झालेल्या परिवर्तन पॅनलसमोर आता संस्थेच्या विकासाची, सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ संस्थेला कोणती नवी दिशा देतात, याकडे सभासद व तळईकरांचे लक्ष लागले आहे. या सत्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर महाले सर, एरंडोल उपतालुका प्रमुख शिवदास पाटील, युवासेना तालुका प्रमुख शुभम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एरंडोल तालुकाध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष अजिज शेख सर, धरणगाव तालुका कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, उपाध्यक्ष रमेश महाजन, जिल्हा युवक कार्याध्यक्ष मोहीत पवार, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सचिव नंदूनाना धनगर, उपाध्यक्ष अमित शिंदे, युवक तालुकाध्यक्ष परेश गुजर, शहराध्यक्ष जुनेद बागवान, संघटक प्रफुल पवार तसेच तळई माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanFelicitation of the newly appointed President and office-bearers of Talai School.

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमधील सहकाऱ्यांकडून महात्मा गांधीजींना श्रद्धांजली !

January 30, 2024

कडगाव येथील शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याचे कळताच पालकमंत्री पोहचले रुग्णालयात !

August 28, 2024

असे राज्यपाल महाराष्ट्रानं कधीही पाहिले नाहीत : शरद पवार

January 25, 2021

ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता समोर आले अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव !

September 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group