बोदवड (प्रतिनिधी) नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने नगरपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. शिवाय नगराध्यक्ष व विषय समिती सभापतींची निवड झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी नगरसेवक दीपक झांबड यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. तर शिवसेनेकडून निष्ठावंत असलेले जिल्हा अल्पसंख्याक उपसंघटक कलीम शेख यांना संधी मिळावी अशी चर्चा त्यांच्या समर्थकांसह शहरात चालली आहे. शिवसेना अल्पसंख्याक उपसंघटक कलीम शेख हे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थकांसह अत्यंत जवळच्या विश्वासूनच्या यादीत त्याचा नंबर अव्वल स्थानी लागतो. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत कलीम शेख यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी जीवापाड मेहनत केली. परंतु तेव्हा थोडक्याने आमदारकीला मुकावे लागले होते. नंतर कलीम शेख यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत अल्पसंख्याक जिल्हा उपसंघटक पदाची जबाबदारी सोपवली. तेव्हापासून कलीम शेख यांनी आपल्या पदाला न्याय देत आमदार चंद्रकांत पाटीलांसाठी जीवापाड मेहनत करून अल्पसंख्यांक समाज संघटन बांधणी मजबूत केली. व 2019 ला त्याचे फलित म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे आमदार झाले. चंद्रकांत पाटील यांच्या वीजयात कलीम शेख यांचा खुप मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन खोडके व माजी शहरप्रमुख राजेश नानवाणी या प्रमुख दावेदारातून एकाला संधी मिळणार आहे.
राष्ट्रवादीकडून निष्ठावंत उमेदवारास संधी मिळण्याची दाट शक्यता असताना शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून ऍड.दीपक झांबड यांना संधी मिळणार आहे ऍड.दीपक झाबड अनुभवी नेतृत्व असून रोखठोक स्वभाव आणि स्वतः व्यवसायाने ते वकील आहेत शिवाय तरुण, तडफदार अल्पसंख्याक समाजातील असल्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेकडून अल्पसंख्याक जिल्हा उपसंघटक कलीम शेख हे आमदारांचे अव्वल स्थानचे विश्वासू असून कट्टर समर्थक आहे. नगरपंचायत निवडणुकीत कलीम शेख यांनी किंगमेकर ची भूमिका बजावली आहे. व एकहाती सत्ता मिळवून देण्यासाठी भरपूर मेहनत केली आहे. राष्ट्रवादी चे गड असलेल्या वार्डात कलीम शेख ने शिवसेनेचा तुरा रोवला असून राष्ट्रवादी चे गड समजले जाणाऱ्या वार्डात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणले आहे.
गजानन खोडके हे चतुर व चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत पक्ष पडतीच्या काळात गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेचे ते काम एकनिष्ठेने पार पाडताना दिसून येतात. २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बोदवड तालुक्यात महत्वाची भूमिका बजावणारे व २०१९ च्या विधान निवडणुकीत आमदार यांच्या विजयात त्यांचा वाटा असल्याचे आजही बोलताना दिसून येतात. व एकेकाळी शिवसेना शहर प्रमुखाची भूमिका पार पाडणारे राजेश नानवाणी हे सुद्धा गेल्या २५ वर्षापासून निष्ठावान म्हणून कार्यरत आहेत. पक्ष वाढीसाठी त्यांचेही मोठे योगदान आहे. अतिशय विश्वासू व निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून राजेश नानवानी आमदार चंद्रकांत पाटील यांचे खदे समर्थक आहेत व नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी आमदारांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे बोदवड नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीने एक निष्ठावंत कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक पदासाठी निश्चित केल्याने आमदार पाटील सुध्दा निष्ठावंत कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांची भावना समजून यांना न्याय देतील का ? या कडे निष्ठावंत शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.